शिरपूर - शिरपूर तालुक्यातून शहादा कडे जाणारा रस्ता काही काळापासून मृत्यूचा सापळा बनला असून रस्त्यांवर पडलेले खड्डे यामुळे वारंवार या रस्त्यावर अपघात होत असून निष्पाप लोकांचा बळी जात आहे . काल देखील या रस्त्यावर अपघात होऊन एका व्यक्तीस आपला प्राण गमवावा लागला आहे यापूर्वी अपघातात काहींना गंभीर दुखापत देखील सहन करावी लागली आहे. मात्र या गोष्टीचे कोणतेही सोयरसुतक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना व ठेकेदारांना या नसल्याने या सर्व अपघातास या विभागाचे अधिकारी व ठेकेदार यांना जबाबदार धरून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आता नागरिकांकडून पुढे येत आहे.
शिरपूर शहादा रस्त्यावर मागील तीन वर्षात अनेक वेळा रस्ता दुरुस्ती व खड्डे भरण्याचे टेंडर दिले गेले तात्पुरते डाग डुगी करण्यात आली लाखोंची बिले खिशात घालण्यात आली मात्र रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात सार्वजनिक बांधकाम विभाग ठेकेदार व अभियंता यांना सपशेल अपयश आले आहे .या रस्त्यावर वारंवार अपघात होत असताना व निरपराध लोकांचे जीव जात असताना याविषयी कोणतीही जाणीव न ठेवता सदरचे ठेकेदार व संबंधित विभाग या बाबींकडे सरळ सरळ डोळेझाक करत आहेत. वास्तविक रित्या रस्ता दुरुस्तीचे काम मंजूर झाल्यानंतर व खड्डे बुजवण्याचे टेंडर दिल्यानंतर काही काळापर्यंत या रस्त्यावर डागडुजी करून देखभाल दुरुस्तीची जबाबदारी ती संबंधित विभागाची व ठेकेदाराची असते. मात्र आपले कामे पूर्ण करून बिल काढून झाल्यावर आपल्या डी. एल. पी
. कालावधी मध्ये कोणतीही खड्डे दुरुस्ती अथवा रस्ते दुरुस्ती करण्यापासून ठेकेदार पर काढतात व दुरुस्तीच्या नावाने पुन्हा खड्ड्यांचे टेंडर घेऊन बिले पास करतात का? असा प्रश्न आता जनतेतून पुढे येत आहे.
या रस्त्यावर देखभाल-दुरुस्ती जबाबदारी असणाऱ्या ठेकेदार व त्यांच्या शिल्लक असलेला डी .एल. पी. कालावधी ची समीक्षा करून या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांना जबाबदार धरून ठेकेदार व अभियंता यांच्यावर कारवाईची मागणी जोर धरत आहे. राजकीय नेते करोडोंचा निधी या रस्त्यासाठी शासन दरबारातून मंजूर करण्याचा दावा करतात व आपली प्रसिद्धी करून घेतात या रस्त्यांवर निधी देखील मंजूर होतो मात्र यानंतर खरा खेळ सुरु होतो, रस्त्याचे टेंडर निघाल्यानंतर त्याला पंचवीस ते तीस टक्क्यांच्या कमी रेट मध्ये काम घ्यायचे यानंतर अनेकांची टक्केवारी ठेकेदाराच्या मार्जिन हे सर्व जाता आता पन्नास टक्के रक्कमच शिल्लक राहते आणि या रकमेतून पुन्हा आपल्याला दर्जेदार कामाची अपेक्षा असते त्यामुळे अशा पद्धतीने तयार केलेले रस्ते हे कागदावर मोठे खर्चिक असतात मात्र प्रत्यक्षात निकृष्ट कामामुळे अल्पावधीतच त्यांच्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण होत असते. त्यामुळे याबाबतचे नियम कायदे अधिक कठोर करून या सर्व बाबींची जबाबदारी ठेकेदार यांच्यावर सुनिश्चित करून ती जबाबदारी ठेकेदार पार पडत नसेल तर अधिकाऱ्यांनी देखील सजग राहून ती कामे त्यांच्याकडून करून घेणे गरजेचे आहे मात्र या सर्व प्रकारात तेरी भी चूप मेरी भी चुप असाच काही खेळ होत असल्याने रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य वाढत जाऊन निरपराध लोकांचा बळी जात आहे .खरे तर शहादा शिरपूर रस्ता राज्य महामार्ग कडे वर्ग करण्यात आला आहे मात्र या रस्त्याची दुर्दशा पाहून राज्य महामार्गाने देखील रस्ता व्यवस्थित करून हस्तांतरण करा याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागास अवगत केले आहे .सदरचा रस्ता दुरुस्त करून त्यावरील खड्डे बुजवून तो हस्तांतरित करण्यासाठी तयार करण्यात यावा यासाठीदेखील सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठांनी वारंवार पत्रव्यवहार केला असताना त्या ठेकेदार कडे या रस्त्याची देखभाल दुरुस्ती जबाबदारी होती त्यांनी आपली जबाबदारी पार न पाडता या रस्त्यावर दुरूस्तीचे नवीन टेंडर निघण्याची प्रतीक्षा करत आपल्या जबाबदारीतून पळ काढला आहे ,आता पुन्हा या रस्त्यांवर करोडो रुपये मंजूर करण्याची घोषणा झाली आहे आणि हा रस्ता पुन्हा एकदा तयार करून राज्य महामार्गाकडे हस्तांतरित होण्याचे प्रयत्न होत आहेत मात्र असे असतांना या पूर्वी झालेल्या रस्त्यांच्या दुर्दशेला जबाबदार कोण व निष्पाप बळी गेले त्या लोकांच्या जीविताशी जबाबदारी कोणाची ? व ज्यांना गंभीर अपंगत्व अपघातामुळे आले त्या सर्वांची जबाबदारी कोणाची ? हे निश्चित करून कारवाई करण्याची वेळ येऊन ठेपली असून किमान यापूर्वी ज्या ठेकेदारांनी कामे घेऊन या रस्त्यांची दुर्दशा केली त्यांना ब्लॅक लिस्ट करून नवीन लोकांना पारदर्शकपणे काम हस्तांतरित करण्यात यावे अशी देखील भावना शहादा शिरपूर रस्त्यावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी व्यक्त केले आहे.
Tags
news


