यवतमाळ जिल्ह्य़ात पत्रकारांवर प्राणघातक हल्ला हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याची. राष्ट्रीय विश्‍वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम मागणी. नाशिक शांताराम दुनबळे.




 नाशिक=वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील दोन पत्रकारांवर गाव गुंडांकडून प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. गुन्हेगारांवर तात्काळ कडक कारवाई करावी व पीडित पत्रकारांना  पोलिस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी राष्ट्रीय विश्‍वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांनी यवतमाळचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप भुजबळ पाटील यांच्याकडे केली आहे.
 सविस्तर वृत्त असे की यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील काळी दौलत खान येथे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या जिल्ह्यातील पुसद येथील धाडसी पत्रकार संदेश कानू व पत्रकार सय्यद फैजान यांच्यावर तीस ते चाळीस गाव गुंडांनी प्राणघातक हल्ला केला व पत्रकारांच्या  जवळील वृत्तांकन करण्यासाठीचे अंदाजे 80 हजार रुपयांचे साहित्य लुटून नेले. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारितेवर हा हल्ला आहे. याबाबत तात्काळ कारवाई न केल्यास राष्ट्रीय विश्‍वगामी पत्रकार संघाच्या वतीने राज्यव्यापी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम, प्रदेशाध्यक्ष वैभव पाटील, विदर्भ प्रदेशाध्यक्ष किशोर इंगळे व यवतमाळ जिल्हा अध्यक्ष पद्माकर घायवान यांनी केले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने