सैनिकांच्या कल्याणासाठी ध्वजनिधी संकलनातून ऋण फेडण्याची संधी : जिल्हाधिकारी जलज शर्मा

 



     धुळे, दि. 17 (जिमाका वृत्तसेवा) : सशस्त्र सेना ध्वजदिन निधीसाठी सर्वानी वेळोवेळी ध्वजनिधी दिला पाहिजे. प्रत्येक भारतीयांच्या मनामध्ये सैनिकांबद्दल सर्वोच्च स्थान आहे. सैनिकांच्या कल्याणासाठी ध्वजनिधी संकलनाच्या माध्यमातून ऋण फेडण्याची संधी समजून ध्वजनिधी संकलनात मोठ्या प्रमाणात सहयोग देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी आज केले.



जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत सैनिकी बहुउद्देशीय हॉल मध्ये आयोजीत सशस्त्र सेना ध्वजदिन-2021 निधी संकलन शुभारंभप्रसंगी जिल्हाधिकारी श्री. शर्मा बोलत होते. यावेळी पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, महानगरपालिका आयुक्त देविदास टेकाळे, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, निवासी जिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी संजय गायकवाड, अपर पोलिस अधीक्षक डॉ. प्रशांत बच्छाव आदी उपस्थित होते.



यावेळी जिल्हाधिकारी श्री. शर्मा म्हणाले, सशस्त्र सेना ध्वजदिन निधीसाठी वेळोवेळी ध्वजनिधी दिला पाहिजे. धुळे जिल्ह्यात  युवकांनी जास्तीत जास्त सैनिक भरती होणे  आवश्यक आहे. राष्ट्रीय छात्र सेनेला सरावासाठी  जागा उपलब्ध करून देण्यात येईल. आपण सर्व जणांनी सशस्त्र सेवा ध्वज दिन निधीस सढळ हाताने मदत करुन राष्ट्रकार्यास हातभार लावला पाहिजे. हा निधी युध्द विधवा, दिव्यांग सैनिक, आजी व माजी सैनिक व त्यांचे अवलंबितांच्या पुनर्वसनासाठी राज्यस्तरावर सैनिक कल्याण विभागाने आखलेल्या कल्याणकारी योजनांवर खर्च केला जातो. यांची संख्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 10 लाखाच्यावर आहे. हा कार्यक्रम अर्थपूर्ण होण्यासाठी सर्वांचा उदारतेने व स्वयंस्फुर्तीने सहभाग व सहाय्य हवे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्री. गायकवाड म्हणाले, 10 वर्षापासून ध्वजनिधी इष्टांक पूर्ण करण्यात येत आहे. या दिवशी समाज सशस्त्र सेना ध्वज निधीस आपला हातभार लावून आजी व माजी शूर सैनिकांच्या प्रती ज्यांनी देशासाठी आपले जीवन अर्पिले, त्यांच्या प्रती नागरिक कृतज्ञता व्यक्त करतात.

सर्वप्रथम दीप प्रज्वलनाने शहीद सैनिकांना श्रध्दांजली वाहण्यात आली. जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी ध्वजदिन-2021 निधी संकलनाचा शुभारंभ केला. प्रमुख पाहुण्यांना ध्वज लावून त्यांचे योगदान स्विकारण्यात आले, तसेच मेजर रामदास पाटील हे दरवर्षी आपला एक महिन्याचे वेतन ध्वजनिधीसाठी मदत केली असून त्यांचा

व वीर पत्नी व वीर माता/पिता आदिंचा सत्कार करण्यात आला.

0000

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने