जयश्रीबेन अमरीशभाई पटेल सी.बी.एस. ई स्कूलमध्ये नाताळ सण आनंदात साजरा



 

शिरपूर (प्रतिनिधी )-शिरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित वाघाडी ता.शिरपूर येथील जयश्रीबेन अमरीशभाई पटेल सी.बी.एस. ई स्कूलमध्ये शुक्रवार ,२४ डिसेंबर रोजी नाताळ सण मोठया उत्साहाने साजरा करण्यात आला.
कार्यक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका मा.रथी नायर मॕडमने सर्वांना नाताळ सणाच्या शुभेच्छा व संदेश दिला. 
नाताळ सणानिमित्त विद्यार्थ्यांनी प्रार्थना गीते गायली.सॅन्टाक्लॉज नी  मुलांचे मनोरंजन करून त्यांना चॉकलेट दिली . शिक्षकांनी नाताळ सणाचे महत्त्व मुलांना सांगितले. पूर्व  प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले . प्राथमिक  वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी कॅरोल गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे त्यात सहभाग घेतला. कार्यक्रमा अंती विजेत्यांना बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात आले . अशाप्रकारे हर्ष व उल्हासात नाताळ सण शाळेत साजरा झाला.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने