पुणे येथील शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने मागील वर्षी शरद पवार साहेबांच्या ८० व्या वाढदिवसानिमित निबंध स्पर्धा घेण्यात आली होती.या स्पर्धेत राज्याच्या कानाकोपऱ्यातून ५०० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता.या स्पर्धेत वनावल ( ता.शिरपुर ) चे सुपुत्र व बुलडाणा येथील सहकार विद्या मंदिर चे शिक्षक दगा लोटन पाटील यांनी शिक्षक व प्राध्यापक गटातून तृतीय क्रमांक प्राप्त केला होता.आज वरळीतील नेहरू सेंटर येथे बक्षीस वितरण समारंभात रु.१० हजार धनादेश व स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन दगा पाटील यांचा गौरव जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल दगा पाटील सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
Tags
news
