एन-मुक्ता स्थानिक शाखा कार्यकारणीची बैठक संपन्न

   




दोंडाईचा- स्वो.वि.संस्थेच्या दादासाहेब रावल महाविद्यालयात एन-मुक्ता स्थानिक शाखा कार्यकारणीची  सभा घेण्यात आली. सभेत मागील वर्षीचा जमा-खर्च हिशोब मांडणी केली. तद्नंतर वर्षेभरात केलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर सर्वानुमते नुतन कार्यकारणीची निवड करण्यात आली.एन-मुक्ता स्थानिक शाखा अध्यक्षपदी डॉ.पी एस गिरासे यांची तर उपाध्यक्षपदी डॉ.सौ. के. डी. राजपूत यांची निवड करण्यात आली. सचिवपदी डॉ.नरेंद्र पाठक, खजिनदार डॉ.धैर्यशील देवरे, अंतर्गत हिशोब तपासणीस डॉ.विनय वाघ, केंद्रीय प्रतिनिधी डॉ.देवेंद्र धाकड तर जिल्हा प्रतिनिधी प्रा.संतोष मराठे. यांची निवड करण्यात आली. सभेला मा. प्राचार्य व सर्व प्राध्यापक बंधू-भगिनी उपस्थित होते.प्राचार्य  महोदय यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना म्हटले की संघटन हे समस्या सोडविण्यासाठी असते. काही समस्या संघटनेने मांडल्या तर समस्या सोडविण्यासाठी पूर्ण सहकार्य करु असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नरेंद्र पाठक यांनी केले. तर आभार प्रदर्शन डॉ. विनय वाघ यांनी केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने