अवकाळी पावसाचा कहर, ६०० ऊसतोड कामगारांना जेवन देऊन दिले माणुसकीचे दर्शन, सेवाभावे प्रतिष्ठानचा उपक्रम




     आपण ज्यावेळेस आपल्या घरात असतो त्यावेळेस आपल्याला पाऊस-थंडी याचे अनुभूती येत नाही. परंतु सध्या चालू असलेली ऊसतोड यात असलेले कामगार गेल्या दोन-तीन दिवसापासून अवकाळी पाऊस व कडक थंडी यांचे अनुभूती ऊसतोड कामगार घेत आहेत. या कामगारांचे जेवन बनवण्याचे सरपन (लाकूड) पावसाने ओले झाले जेवण बनवता येणार नव्हते. यावेळेस सेवाभावे प्रतिष्ठाने जेवण तयार करून ऊसतोड कामगारांचे जेवणाची व्यवस्था करून दिले. 
     तळोदा तालुक्यात सलसाडी,मोरवड,तळोदा हातोडा रोड या परिसरात ६०० ऊसतोड कामगारांना भोजन खाऊ घालण्यात आली. या प्रसंगी सेवाभावे प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमेश भैय्या सोनवणे,संचालक अतुल भिमसिंग पाटील,मोरवड गावाचे उपसरपंच रंजीत चौधरी,कार्याध्यक्ष संतोष चौधरी,सलसाडी स्कूल कमिटी अध्यक्ष संजय बहादूरसिंग मोरे, उपाध्यक्ष सागर पाटील,दिलवरसिंग भील, मोग्‍या ठाकरे दिलीप पाडवी उमेश चुनीलाल ठाकरे सुनील पाडवी महेश ठाकरे चिन ठाकरे मोग्‍या पाटील दर्शन चौधरी यांनी भोजन तयार करून वाटप केले.
     यावेळी सेवाभावे प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमेश भैय्या सोनवणे म्हणाले की,गोरगरीब ऊसतोड कामगार हे आमचे बंधू आहेत.त्यांच्या दुःखात सामील होणं हेच आमचे सेवाभावे याचे कर्तव्य आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने