नाशिक मतदारसंघ मतदार याद्यांचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम;दावे व हरकती दाखल करण्यासाठी ०५ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ नाशिक शांताराम दुनबळे




 नाशिक=नाशिक शहर व जिल्हा मतदार याद्यांचा विशेष पुननिरीक्षण कार्यक्रम दावे व हरकती दाखल करण्यासाठी पाच डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे भारत निवडणूक आयोग यांच्या निर्देशान्वये १ जानेवारी २०२२ या आर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. 

त्याअनुषंगाने सदर यादी संदर्भात दावे व हरकती दाखल करण्यासाठी  रविवार ०५ डिसेंबर २०२१ पर्यंत मुतदवाढ देण्यात आली असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी तथा उप जिल्हा निवडणूक अधिकारी स्वाती थविल यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.

मतदार याद्यांचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम अंतर्गत ०१ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिध्दी झाली आहे. या संदर्भात असणारे दावे व हरकती  दाखल करण्याचा कालावधी  ०१ नोव्हेंबर २०२१ ते 30 नोव्हेंबर २०२१ पर्यंत निश्चित करण्यात आला होता. 

भारत निवडणूक आयोग नवी दिल्ली यांच्या ३० नोव्हेंबर २०२१ रोजीच्या पत्रान्वये मतदार नोंदणी नियम १९६० च्या नियम १२ मधील तरतुदीद्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून राज्यात चालु असलेल्या ०१ जानेवारी २०२२ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह असणाऱ्या यादींच्या प्रगतीचा आढावा घेवून दावे व हरकती दाखल करण्यासाठी ही मुदवाढ देण्यात आली आहे. 

त्याअनुषंगाने या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांना दावे व हरकती दाखल करून, तात्काळ कार्यवाही करण्यासाठी सूचित करण्यात आले असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्वाती थविल यांनी दिली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने