श्री क्षेत्र नागेश्‍वर सेवा संस्थान येथे श्री दत्त मंदिरात महाप्रसाद व दर्शनाचा भाविकांनी घेतला लाभ



शिरपूर : श्री क्षेत्र नागेश्‍वर सेवा संस्थान, नागेश्वर अजनाड बंगला येथे श्री दत्त मंदिरात महाप्रसाद, भजन संगीत व दर्शनाचा असंख्य भाविकांनी लाभ घेतला.

श्री नागेश्वर सेवा संस्थानचे अध्यक्ष तथा शिरपूर-वरवाडे नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष भूपेशभाई रसिकलाल पटेल यांनी गेल्या दोन वर्षांपूर्वी श्री क्षेत्र नागेश्वर देवस्थान येथे श्री दत्त प्रभू यांच्या मूर्तीची देखील प्राणप्रतिष्ठा केली आहे. श्री दत्त जयंती निमित्ताने दि 18 डिसेंबर शनिवार रोजी दुपारी 12 ते 2 या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच सकाळी 10 ते 12 या वेळेत वारकरी संगीत भजन महाआरती, पूजा दुपारी 12 वाजता दर्शनाचा लाभ असंख्य भाविकांनी लाभ घेतला.



शिरपूर तालुक्याचे आमदार काशिराम पावरा यांच्या हस्ते महाआरती व विधिवत पूजा करण्यात आली. या सर्व धार्मिक कार्यक्रमांना आमदार काशिराम पावरा, माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी, जीवन चौधरी, हभप भोंगे महाराज, बाजार समिती सभापती नरेंद्रसिंग सिसोदिया, जिल्हा उपाध्यक्ष के. डी. पाटील, गोपाल भंडारी, भटू माळी मांडळ, आर. एफ. ओ. स्वाती गंभरे, प्रकाश चौधरी, जिल्हा परिषद सदस्य भरत पाटील, जयवंत पाडवी, रमण भाऊसाहेब पावरा, बेबीबाई पावरा, जिल्हा परिषद सदस्य सखुबाई पवार, मर्चंट बँक चेअरमन प्रसन्न जैन, सुभाष कुलकर्णी, सरचिटणीस अरुण धोबी, तालुकाध्यक्ष किशोर माळी, बाबुलाल महाजन, चंद्रकांत माळी, कैलासचंद्र अग्रवाल, गोकुळसिंग राजपूत, जगतसिंग राजपूत जगन टेलर पावरा, दर्यावसिंह जाधव, शामकांत ईशी, शिरपूर पीपल्स बँक संचालक संजय चौधरी, सामाजिक कार्यकर्ते भालेराव माळी, दरबार जाधव, अनारसिंग जाधव, गोविंदसिंग जाधव, अविनाश पाटील, संतोष माळी, बापू पाटील, सुनील जैन, योगेश्वर माळी, प्रकाश गुरव, नवनीत राखेचा, शिरपूर शहर व तालुक्यातील अनेक संस्थांचे पदाधिकारी, पंचक्रोशीतील सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, भाविक, तालुक्यातील अनेक गावांचे भजनी मंडळ, ग्रामस्थ उपस्थित होते.

सर्व धार्मिक कार्यक्रमानंतर



 उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तालुक्याचे आमदार काशिराम पावरा यांनी सर्वांना श्री दत्त जयंतीच्या शुभेच्छा देऊन आपल्या मनोगतात यावेळी सांगितले कि, माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल व उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी श्री क्षेत्र नागेश्वर संस्थानचा मोठ्या प्रमाणात विकासकरून शिरपूर तालुक्यासह खानदेशात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात व अनेक राज्यांच्या भाविकांसाठी मोठे धार्मिक व निसर्गरम्य स्थळ विकसित केले आहे. पटेल परिवाराने सर्वच क्षेत्रात मनापासून उत्तम कामगिरी बजावली असून शिरपूर तालुका शांत व धार्मिक असल्याची बाब आनंद देणारी आहे. यावेळी प्रास्ताविक संजय चौधरी यांनी केले. सूत्रसंचालन अविनाश पाटील यांनी केले.


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने