तालुक्यातील विखरण येथे 40 वर्षीय व्यक्तीची राहत्या घरी गळफास केली आत्महत्या




शिरपूर तालुक्यातील विखरण येथील 40 वर्षीय व्यक्तीने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली असून शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.सागर रवींद्र पाटील वय 40 रा.विखरण ता.शिरपूर जि.धुळे असे गळफास घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे.


          याप्रकरणी वार्डबॉय प्रवीण पाटील याने दिलेल्या खबरीनुसार सागर रवींद्र पाटील याने  शनिवारी  सकाळी 11:30 वाजेच्या सुमारास विखरण येथील राहत्या घरी दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला.त्यास त्याचे काका चंद्रकांत रोहिदास पाटील याने दुपारी एक वाजेच्या सुमारास शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉ.अमोल जैन यांनी तपासणी करून मयत घोषित केले.याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास पोना अनिल शिरसाठ करीत आहेत.


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने