मुंबई - इजराइल मधील इलाथ येथे झालेल्या 70 मिस युनिव्हर्स 2021 मध्ये भारताने क्रावून पदक जिंकले आहे. हरनाज संधू ने पराग्वे आणि दक्षिण आफ्रिका या स्पर्धकांना मागे टाकून सदरचे पदक मिळवले आहे .जागतिक स्तरावर थेट प्रक्षेपित झालेल्या कार्यक्रमात संधू ला मेक्सिकोच्या माजी मिस युनिव्हर्स अंडरिया मेझा 2020 च यांनी मुकुट प्रदान केला.
हा क्षण संधू सह सर्वांनाच भाऊक करणारा ठरला होता. प्रथम आणि द्वितीय उपविजेते अनुक्रमे पराग्वे आणि दक्षिण आफ्रिका होते सदरच्या सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा ठरला असून यापूर्वी भारताकडून 2000 मध्ये लारा दत्ता नाही विजेतेपद जिंकले होते. मात्र आता तब्बल 21 वर्षांनी भारताने हा ताज पटकावला असून संपूर्ण भारतीयांसाठी हा गर्वाचा क्षण ठरला आहे. पहिल्या तीन फेरीचा एक भाग म्हणून स्पर्धकांना प्रश्न विचारण्यात आला होता की तरुण महिलांना आजच्या काळात येणाऱ्या द भावांना कसे सामोरे गेले पाहिजे? याविषयी तुम्ही काय सल्ला द्याल ? यावर हरणाझ म्हणाली आजच्या तरुणाईला सर्वात मोठा दबाव म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणे, आपण अद्वितीय आहात हे जाणून घेणे आपल्याला सुंदर बनवते इतरांशी स्वतःची तुलना करणे थांबूवून आणि जगभरात घडणाऱ्या अधिक महत्त्वाच्या गोष्टींबद्दल बोला ,बाहेर या स्वतःसाठी बोला कारण तुम्ही तुमच्या जीवनाचे नेते आहात, मी तुझाच आवाज आहे, माझ्या स्वतःवर विश्वास आहे आणि म्हणून मी इथे उभा आहे असे उत्तर तिने दिले .
तिच्या या दमदार उत्तरानंतर या सौंदर्य स्पर्धेमध्ये टॉप 3 मध्ये तिने स्थान मिळवले
हरनाझ संधु चंदिगडचे राहणारी असून ती मॉडेल आहे .यापूर्वी पंजाबी चित्रपट सृष्टीत तिने पदार्पण केले आहे .शिवाय तिने अनेक सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेत विजय मिळवला आहे .शिवाय ती अभ्यासात देखील हुशार असून तिचे पदवीपर्यंतचे शिक्षण देखील पूर्ण झाले आहे सध्या ती पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करत आहे. तिला घोडेस्वारी आणि पोहण्याची आवड आहे. 2017 मध्ये टाइम्स फ्रेश फेस तिचे सौंदर्य स्पर्धेत या प्रवासाला सुरुवात केली ,तिच्याकडे फेमिना मिस इंडिया पंजाब 2019 सारखे अनेक स्पर्धा किताबे देखील आहेत. तिने अनेक पंजाबी चित्रपटांमध्ये काम केले आहे .
आता तिने भारतासाठी मिस युनिव्हर्स 2021 जिंकून मानाचा तुरा शिरपेचात रोवल्याल्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Tags
news




