भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी, आ. काशिराम पावरा यांचा प्रमुख उपस्थित केंद्र सरकार प्रमाणेच राज्यात पेट्रोल डिझेलचे भाव कमी करावे तहसिलदार यांना भाजपाचे निवेदन





 शिरपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने दिवाळीच्या पूर्व संध्येला पेट्रोलवरील एक्साईज कर पाच रुपये प्रतिलीटर तर डिझेल वरील एक्साईज कर दहा रुपये प्रतिलीटर कमी करून जनतेला मोठा दिलासा दिला आहे. केंद्र सरकारने कर कपात केल्यामुळे एकूण करांचा परिणाम ध्यानात घेता, महाराष्ट्रात प्रत्यक्षात पेट्रोल सहा रुपये व डिझेल बारा रुपये स्वस्त झाले आहे.



 मोदी सरकारने ज्या प्रकारे पेट्रोल, डिझेल वरील करात कपात करून जनतेला दिलासा दिला त्याच प्रकारे राज्यातील महाविकास आघाडी सरकारनेही करात कपात करून पेट्रोल डिझेलचे भाव कमी करुन जनतेला दिलासा दिला पाहिजे. यासाठी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी, आ. काशिराम पावरा यांचा नेतृत्वाखाली तहसिलदार आबा महाजन यांना (दि.12 नोव्हेंबर) रोजी शिरपूर भारतीय जनता पार्टीने मागणीचे निवेदन दिले.



 तालुकाध्यक्ष किशोर माळी, शहराध्यक्ष हेमंत पाटील, धुळे मा. जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, जिल्हा उपाध्यक्ष के. डी. पाटील, ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील, मा. जिल्हा चिटणीस संजय आसापुरे, तालुका चिटणीस सुनिल चौधरी, शहर सरचिटणीस महेंद्र पाटील, अल्पसंख्यक मोर्चा जिल्हा सरचिटणीस मुबीन शेख, नगर सेवक देवेंद्र राजपुत, माजी नगर सेवक बापु थोरात, युवा मोर्चा शहराध्यक्ष विक्की चौधरी, राधेश्याम भोई, अविनाश शिंपी, हेमंत बोरसे, राधेश्याम चौधरी, विजय सुर्यवंशी, राजेंद्र गुजर, गणेश माळी आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी, आ. काशिराम पावरा यांनी तहसिलदार यांचाशी याविषयी सविस्तर चर्चा केली. निवेदनात म्हटले आहे की, महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी सातत्याने पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात आंदोलने केली होती. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठा दिलासा दिल्यानंतर राज्यातील आघाडी सरकारनेही कर कपात करून नागरिकांना अधिक मदत केली पाहिजे ही जनतेची स्वाभाविक अपेक्षा आहे. तथापि अजूनही राज्य सरकार कडून टाळाटाळ होत असल्याने आघाडीतील घटक पक्षांची आंदोलने म्हणजे केवळ राजकीय मतलबीपणा होता हे स्पष्ट झाले आहे. भाजपा शासित राज्यांनी नागरिकांना करात कपात करून अधिकची सवलत दिली पण महाराष्ट्राने दिलेली नाही. राज्यात डिझेलवर २४ टक्के व्हॅट आकारला जातो आणि पेट्रोलवर २५ टक्के व्हॅट आकारला जातो. त्या खेरीज पेट्रोलवर प्रती लिटर नऊ रुपये सेसहीआहे. यामध्ये दुष्काळासाठी लागू केलेल्या तीन रुपये प्रतिलीटर सेसचा समावेश आहे. राज्य सरकारला पेट्रोल डिझेलवर करापोटी तीस ते चाळीस रुपये प्रति लिटर मिळतात. राज्य सरकारने पेट्रोल व डिझेल वरील व्हॅट कमी करून मोदी सरकार प्रमाणेच पेट्रोलसाठी पाच रुपये तर डिझेलसाठी दहा रुपये कमी करावेत. तसेच राज्यात दुष्काळी स्थिती नाही, त्यामुळे पेट्रोल वरील प्रती लीटर तीन रुपये दुष्काळी सेस ताबडतोब रद्द करावा व ही कपात व्हॅट कमी केल्यामुळे मिळणाऱ्या सवलती शिवाय अतिरिक्त असावी अशी मागणीचे निवेदन शिरपूर भाजपा तर्फे तहसिलदार यांना देण्यात आले आहे.


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने