अनिल पवार यांचे कार्य युवा पिढीला प्रेरणादायी- हर्षवर्धन पाटील प्रतिनिधी दत्ता पारेकर




पुणे: आनिल  पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा व रक्तदान शिबिराचे आयोजन समस्त वडार समाजाच्या वतीने वडारगल्ली येथे करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना त्यांनी वडार समाजाचे नेतृत्व करणारे अनिल पवार यांचे कार्य युवा पिढीला प्रेरणादायी व आदर्श असल्याचे मत व्यक्त केले.
   हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते अनिल पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले.
 हर्षवर्धन पाटील म्हणाले की,' समाजामध्ये काम करण्याची जिद्द आणि चिकाटी अनिल पवार यांच्यामध्ये असून ते होतकरू व जिद्दी आहेत. रक्तदान शिबिराचा हा उपक्रम स्तुत्य असून रक्तदाता हा अनेक अर्थाने श्रेष्ठ ठरतो. वडार समाज हा प्रामाणिक समाज असून नेहमीच या समाजाने आम्हाला सहकार्य केलेले आहे. अनेक सुख सुविधा उपलब्ध करुन समाजाचा विकास होण्याच्या दृष्टीने प्रयत्न केलेला आहे व पुढे ही प्रयत्नशील राहणार असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.'
     यावेळी माजी नगरसेवक विश्वनाथ पवार, नवनाथ पवार, रोहिदास पवार, पिंटू घोडके, शिवाजी चव्हाण, दुर्गा शिंदे उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने