पाटील परिवाराच्या शाही विवाह सोहळ्यात अनाथ व मतिमंद मुलांना आमंत्रण व स्नेहभोजन
आनंद सोहळ्यात देखील जपला सामाजिक वसा
या अभिनव उपक्रमाचे सर्व स्तरावरून कौतुक
महेंद्र सिंह राजपूत शिरपूर
लग्न सोहळा म्हटला की साधारणपणे नातेवाईक आप्तेष्ट मित्रपरिवार व राजकीय व सामाजिक स्तरावरील नामांकित व समाजातील प्रतिष्ठित लोकांना आमंत्रित करण्याची प्रथा असते आणि या सर्वांच्या साक्षीने व आशीर्वादाने अनेक विवाह सोहळे हे पार पडत असतात .मात्र शिरपूर शहरात दिनांक 20 नोव्हेंबर रोजी झालेल्या शाही विवाह सोहळ्यात या सर्वांना तर आमंत्रित करण्यात आले होते, मात्र त्याबरोबर सामाजिक बांधिलकी व गोरगरिबांना विषयी कृतज्ञता व स्नेह भाव व्यक्त करण्यासाठी व त्यांनाही सामाजिक सन्मान प्राप्त करून देण्यासाठी शहरातील पाटील (सोनवणे) परिवाराने एक नवा आदर्श समाजासमोर उभा केला आणि आपल्या भव्य दिव्य दिमाखदार व शाही विवाह सोहळ्यात या परिवाराने चक्क आश्रम शाळेतील मतिमंद मुलांना आमंत्रित करून त्यांची लग्न सोहळ्यात स्वागत करून त्यांना प्रथम भोजनाच्या पंक्तीत बसण्याच्या मान देऊन यथोचित पाहुणचार करण्यात आला. व त्यांना सामाजिक सन्मान देण्यात आला.
शहरातील पाटील परिवाराला वडिलोपार्जित अशी समाजसेवेची परंपरा असून आजही आपली समाजसेवेची परंपरा कायम ठेवत गोरगरीब व मतिमंद मुलांना त्यांना आपल्या विवाह सोहळ्यात आमंत्रित करून एक नवीन सामाजिक वसा जपला आहे.
शिरपूर तालुक्याील भाजपचे ज्येष्ठ नेते तथा जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य व नगरसेवक श्री मोहन हुलेसिंग पाटील ( मनु दादा ) यांचे चिरंजीव व शिरपूर भाजपा शहर अध्यक्ष तथा नगरसेवक श्री हेमंत गुलाबराव पाटील यांचे बंधू चिरंजीव प्रसाद मोहनराव पाटील यांच्या २० नोव्हेंबर रोजी भव्य दिव्य विवाह सोहळ्यात तालुक्यातील व शहरातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर व नातेवाईक मित्र परिवार यावेळी उपस्थित संपन्न झाला. ह्या विवाह सोहळ्याची जय्यत तयारी गेल्या एक ते दीड महिन्यापासून शहरातील वरझडी रस्त्यावरील हूलेसिंग नाना पार्क ग्राऊंडवर सुरू होती व सदरचा विवाह सोहळा हे शहरातील एक प्रमुख आकर्षण ठरले आहे.
पण हा विवाह सोहळा जरी पाटील परीवरातील सर्वांसाठी आनंदाचा क्षण असला तरी ह्या आनंदात अनाथ मतिमंद मुलांना देखील सहभागी करण्याचा एक अभिनव व स्तुत्य उपक्रम यावेळी आपल्या सर्वांना पाहायला मिळाला आहे .
याबद्दल नगरसेवक हेमंत पाटील यांनी व वर प्रसाद मोहनराव पाटील व मित्र परिवार व सोनवणे परिवार हे करवंद नाक्यावरील अनाथ मतिमंद शाळेत जाऊन तेथील मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्याशी संपर्क साधला व तिथेच मुलांना निमंत्रण पत्रिका त्यांच्या हातात देऊन व सर्वांना लग्नात येण्याचे आग्रहाचे आमंत्रण देण्यात आले होते. आपल्या या आनंद सोहळ्यात
अनाथ मतिमंद मुलांना गोड घास खाऊ घालुन नवरदेव युवा नेते प्रसाद पाटील यांचे लहान बंधू डॉक्टर हीतेश मोहनराव पाटील , भाजपा शहर अध्यक्ष तथा नगरसेवक हेमंत पाटील संस्थेचे अध्यक्ष भगवानभाऊ तलवारे .. नगरसेवक रोहितभाऊ शेटे .. नगरसेवक अमोलभाऊ पाटील व पंकज पाटील इत्यादींनी या मुलांच्या यथोचित सन्मान आणि पाहुणचार केला.
सदरच्या स्तुत्य उपक्रमाचे सर्व सामाजिक स्तरातून कौतुक होत असून अशा भव्य दिव्य व शाही विवाह सोहळ्यात आमच्या विद्यार्थ्यांना आमंत्रित करून या परिवाराने एक नवीन आदर्श जपला आहे अशी भावना संस्थेचे अध्यक्ष भगवान तलवारे यांनी व्यक्त केले असून याबाबत त्यांनी आभार व्यक्त केले आहे. तर इतर सर्व मान्यवरांसोबत या विद्यार्थ्यांना आमंत्रित करून त्यांच्या यथोचित सन्मान करण्यात आम्हाला देखील मनस्वी आनंद झाल्याची भावना पाटील परिवारा कडून नगरसेवक हेमंत पाटील यांनी व्यक्त केले आहे.
Tags
news



