पुणे: पिपंरी चिचंवड येथे दोघांचा मृतदेह हा दिघीमधील एका लॉजमध्ये आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.मयत तरुणाचे नाव प्रकाश ठोसर असे असल्याचे समजते. प्रकाश याने आधी त्याच्या प्रेयसीला संपवले आणि त्यानंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली, असे प्रथमदर्शनी दिसते आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन वर्षांपासून मयत प्रकाश ठोसर आणि ३० वर्षीय विवाहित महिलेचे प्रेमसंबंध होते. दिघी येथील याच लॉजमध्ये ते कायम भेटत होते . अनेक वेळा ते रात्री मुक्कामी येत असत आणि सकाळ झाली कि दोघेही निघून जात असत. सातत्याने ते इथे येत असल्याने लॉजच्या स्टाफचा देखील त्यांच्याशी परिचय होता . २५ नोव्हेंबर रोजी ही घटना उघडकीस आली आहे .
काल रात्री नेहमीप्रमाणे दोघे लॉजवर आले होते. रूम आतून लावून घेतल्यावर ते पुन्हा बाहेर आलेच नाहीत. सकाळी चेक आऊट कऱण्याचा वेळ झाला तरी या दोघांनी रूमचा दरवाजा दोघांपैकी कोणीच उघडला नाही म्हणून शंका आल्यावर कामगाराने दरवाजा ठोठावला मात्र आतून काहीच प्रतिसाद न आल्याने स्टाफला शंका आली आणि त्यांनी त्या बाबत पोलिसात खबर दिली.
पोलिसांना बातमी समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पोलिसांनी लॉजवर येऊन दरवाजा तोडून रुममध्ये प्रवेश केला तेव्हा प्रकाशचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत होता तर खाली जमीनीवर ३० वर्षीय महिला देखील मृत आढळून आली. प्रथमदर्शनी प्रकाशने विवाहित प्रेयसीचा खून करून आत्महत्या केली असल्याचा अंदाज दिघी पोलिसांनी व्यक्त केला आहे
Tags
news
