दोडाईचा येथे आठ नोव्हेबर रोजी जनतेने मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचा लाभ घ्यावा.* *जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर भामरे यांचे आवाहन.*




दोंडाईचा ( अख्तर शाह) 
 दोडाईचा ८ नोव्हेंबर रोजी केशरानंद नगर येथे आयोजित  महाआरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विद्यमान जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर भामरे यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले आहे.
कोरोना सारख्या महामारीत प्रत्येकाला पेलवता न  येणाऱ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले. यामुळे रुग्णांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी आणि दिशाहीन झालेल्या कुटुंबाला योग्य दिशा मिळावी म्हणून पूर्णपणे  मोफत असलेल्या शस्त्रक्रिया शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष, विद्यमान सदस्य ज्ञानेश्वर भामरे यांनी दोंडाईचात पत्रकार परिषदेत केले. प्रसंगी माजी नगराध्यक्ष नानाभाऊ मराठे, ,छत्रपती शिवाजी ब्रिगेडचे अशोक शिंदे, रोशन मराठे, निंबा मराठे, जी बी पाटील, एडवोकेट एकनाथ भावसार, महेंद्र पाटील, रविराज भामरे, दिपक गिरासे, पंचायत समिती सदस्य दिपक पाटील, दादाभाई कापुरे आदी उपस्थित होते.
रेडस्वस्तिक सोसायटी धुळे, छत्रपती शिवाजी ब्रिगेड महाराष्ट्र राज्य या सामाजिक संस्थेच्या वतीने हे आयोजन करण्यात आले आहे. यात प्रथम ५८ रुग्णांना मोफत कानाचे मशीन तर प्रथम १५९ रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात येणार आहे. हाडांच्या विविध ४८ प्रकारच्या तपासण्या, आणि इसीजीचा डिजीटल अहवाल एका दिवसात उपलब्ध होणार आहे.
नामांकित आणि तज्ञ डॉक्टरांचा मार्गदर्शन व औषधे उपलब्ध होणार आहेत यासाठी मुंबई येथील लाईफ लाईन हॉस्पिटल (मालाड), अपेक्स हॉस्पिटल (बोरीवली), मल्लिका हॉस्पिटल (जोगेश्वरी मुंबई), अश्विनी हॉस्पिटल(विरार) ,जनसेवा हॉस्पिटल (वसई) एस एम बी टी हॉस्पिटल (नाशिक) केशरानंद हॉस्पिटल( धुळे )अशा नामांकित हॉस्पिटल यांचा  शिबिरात सहभाग आहे.
डॉ. गिरीश ओझा, डॉ.महेंद्र बोरसे, डॉ. रोहित सिंग, डॉ.वरुण बंसल, डॉ. कैलाश सुरनारे डॉ. कमलेश शहा, डॉ. योगेश शुल्का ,डॉ. दर्पण ठाकरे, डॉ, साकेत साठे, डॉ, अभिजित सोनी आदी तज्ञ शल्यचिकित्सक यांचा चमू उपस्थिती राहणार आहे.
हृदयाची एन्जोप्लास्टी बायपास शस्त्रक्रिया पित्ताशयाचे खडे हृदयाचं मेडिकल मॅनेजमेंट बालकांच्या हृदयाच्या शस्त्रक्रिया मुतखडा शस्त्रक्रिया मोफत डायलिसिस कॅन्सर शस्त्रक्रिया मोतीबिंदु शस्त्रक्रिया पेस मेकर वॉल सर्जरी जनरल सर्जरी स्त्रियांच्या गर्भाशयातील गाठी  किंवा गर्भपिशवी दुरुस्ती, हर्निया अपेंडिक्स ,कानाच्या पडद्याची शस्त्रक्रिया, मुळव्याध, हायड्रोसिल आदी शस्त्रक्रिया व उपचार या आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरात करण्यात येणार आहे.
अशोक शिंदे,रोशन मराठे,ऍड.भावसार, महेंद्र पाटील यांनी मार्गदर्शन केले. शिबिरात येताना प्रत्येक रुग्ण आणि आपले जुने रिपोर्ट आधार कार्ड सोबत आणून रोशन मराठे मोहित सोनवणे, ताहीर अन्सारी, संतोष पाटील यांच्याशी अधिक माहितीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने