-
पुणे:इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त तसेच भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतवर्षा निमित्त आणि फिट इंडिया उपक्रमांतर्गत मास्टर गेम्स असोसिएशन महाराष्ट्र आणि इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने इंदापुरमध्ये दिनांक 25 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर रोजी चार दिवसीय मास्टर गेम्सचे आयोजन करण्यात आले असून ही स्पर्धा वय वर्ष 30 च्या पुढील वयोगटासाठी असून यामध्ये ॲथलेटिक्स, बास्केटबॉल, बॅडमिंटन सायकलिंग, फुटबॉल, कबड्डी, टेबल टेनिस, व्हॉलिबॉल यासारख्या क्रीडा प्रकाराचे राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
शारीरिक तंदुरुस्तीसाठी व उत्तम आरोग्यासाठी तसेच मानसिक प्रबलता निर्माण होण्यासाठी क्रीडा स्पर्धेला अनन्यसाधारण महत्त्व असते त्यातून फिट राहून आपले चांगले आरोग्य राहावे हा संदेश फिट इंडिया उपक्रमांतर्गत घरोघरी पोहोचता यावा यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले आहे.राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते या स्पर्धेचे उदघाटन होणार असून इंदापूर महाविद्यालय अशा अनेक उपक्रमाअंतर्गत करके तो देखो, सायकल रॅली,आयपीएल, एकता रॅली इंदापूर यासारख्या अनेक उपक्रमाचे आयोजन करीत असते.
राज्यस्तरीय मास्टर गेम्स स्पर्धेतून निवडलेले खेळाडू हैदराबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत खेळले जाणार आहेत.
राज्यस्तरीय मास्टर गेम्स स्पर्धेसाठी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले आहे.
Tags
news
