*शिंदखेडा (प्रतिनिधी)* : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील योजनाबाह्य / अवर्गीकृत (NON PLAN) रस्त्यांचा समावेश ग्रामीण मार्ग म्हणून ‘रस्ते विकास योजना 2001-21’ मध्ये समाविष्ठ करण्यात आले असून त्याबाबतचे शासकीय परिपत्रक नुकतेच प्रसिध्द करण्यात आले. शिंदखेडा तालुक्यातील खराब ग्रामीण रस्त्यांचा प्रश्न शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांनी गेल्या अनेक वर्षापासुन लावुन धरला होता. या संदर्भात सातत्याने पाठपुरावा सुरु होता. त्या पाठपुराव्याला यश आले आहे.
शिंदखेडा तालुक्यात ग्रामीण भागातील रस्ते अत्यंत खराब झाले होते. परिणामी ग्रामस्थांना दळणवळण करतांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या रस्त्यांची दुरुस्ती करणे गरजेचे होते. याबाबत जिल्हा परिषद प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधला असता हा नॉन प्लॅन (NON PLAN) रस्ता असल्यामुळे याची दुरुस्ती किंवा नुतनीकरण करता येत नाही, असे सांगण्यात आले होते. यासंदर्भात शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांनी हा प्रश्न प्रशासकीय पातळीवर लावुन धरला.
ग्रामीण भागात दर्जोन्नत रस्ते झालेच पाहिजे यासाठी जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच धुळे जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री ना.दादा भुसे व विद्यमान पालकमंत्री ना.अब्दुल सत्तार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला. यासंदर्भात पालकमंत्री ना.अब्दुल सत्तार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना मंत्रालयात बोलावून बैठक घेतली. या बैठकीला श्री.साळुंके उपस्थित होते. या बैठकीत संबंधीत अधिकाऱ्यांशी चर्चा करुन लवकरात लवकर सदरील रस्ते दर्जोन्नत करण्याचा सूचना ना.सत्तार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. याबाबतीत शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आले असून धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील रस्त्याचा ग्रामीण मार्ग म्हणून दर्जोन्नत करण्याबाबचा शासन निर्णय झाला.
यामध्ये विटाई ते वायपुर रस्ता 2.5 कि.मी., साहुर शिव ते नवेकाडदे रस्ता 3.1 कि.मी., जुनेकोडदे ते जुने शेंदवाडे मधलीवाट रस्ता 3.5 कि.मी., झोटवाडे शिव (ग्रामा-7 पासुन) ते होळ टेकडी शिवरस्ता (ग्रामा-7 पर्यंत) 2.3 कि.मी., नेवाडे ते इजिमा-6 ला जोडणारा रस्ता 3.00 कि.मी., प्ररामा-1 (निमगुळ) ते तावखेडा प्र.न.कडे जाणारा रस्ता 2.4 कि.मी., नवे शेंदवाडे ते नवे कोडदे रस्ता 5.00 कि.मी., ब्राम्हणे ते नवे काडदे रस्ता (ग्रामा-5 ते ग्रामा-7 ला जोडणारा रस्ता) 3.5 कि.मी., ब्राम्हणे ते मंदाणे रस्ता (प्रजिमा-16 पासुन ते नवे कोडदे फाट्यापासून ते प्ररामा-1 दोंडाईचा ब्राम्हणे रस्त्याला जोडणारा रस्ता 2.6 कि.मी., ब्राम्हणे ते लंघाणे रस्ता 2.4 कि.मी., जुने कोडदे ते विरदेल रस्ता 3.5 कि.मी., वायपूर ते चांदवड रस्ता 2.00 कि.मी., वर्षी ते निरगुडी रस्ता 2.5 कि.मी., दभाषी (वर्षी) कामखेडा फाटा रामा-3 रस्ता 2.00 कि.मी., रामा-6 ते जातोडा रस्ता 3.5 कि.मी., पाष्टे ते रामा-16 रस्ता 2.5 कि.मी., बेटावद ते मुडावद रामा-16 ते भिलाणे रस्ता 3.5 कि.मी. या रस्त्यांचा समावेश आहे.
शिंदखेडा तालुक्यातील ग्रामीण रस्ते लवकरच दर्जोन्नत बनतील. ग्रामस्थांना दळणवळण करतांना कोणतीही अडचण येणार नाही. ग्रामीण भागात मजबुत व दर्जेदार रस्ते तयार झाल्यास विकासाची गंगा गावागावात पोहोचविणे सोपे होईल, असे शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांनी सांगितले. सदरील अवर्गीकृत रस्ते वर्गीकृत श्रेणीत मंजुर झाल्याने तालुक्यातील ग्रामस्थांकडून श्री.साळुंके यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहे.
Tags
news


