(श्री.प्रभाकर आडगाळे)
मालपुर ता.शिंदखेडा येथील केंद्रशाळा १ मध्ये पहिली ते चौथी च्या विध्यार्थाना पुस्तक वाटप करुनशालेयव्यवस्थापन समितीची आढावा बैठक घेण्यात आली. मुख्याध्यापक कार्यालयात ठिक १०वाजता झाली. अध्यक्षस्थानी श्री.गोकुळयुवराज बच्छाव होते.
दिपावली सुट्टी नंतर आॅपलाईन शाळा सुरु करण्यात येईल. व शाळा न.१डिझीटील करण्याचा मानस आहे.त्याबाबतीत व्यवस्थापन समितीने व ग्रामपंचायतने देखील सहकार्य करावे. तसेच तीन ही शाळेच्या सहकार्याने साऊड सिस्टिमची व्यवस्था करण्यात आली आहे.
शाळेच्या जवळ मागच्याबाजुला असलेले घर मालक यांनी सांडपाण्याची व्यवस्था करण्यात करुन आपल्या शाळेची आरोग्याची काळजी घ्यावी.व सहकार्य करावे.तशी लेखी तक्रार ग्रामपंचापतीला दिलीआहे.वाचनालयासाठी स्वतंञ गेटची व्यवस्था करण्यात येणार आहे.तालुक्यात व केंद्रात शाळा नबर १कशी होईल मी माझे सहकारी शिक्षक,शिक्षेक्तर वर्गाचा निर्धार आहे.अशी माहिती निर्भिडन्युजशी बोलतांना सांगितले.त्याप्रसंगी उपसरपंच श्री. जगदिश सखाराम खंडेरायशालेय समितीचे अध्यक्षश्री.गोकुळ युवराज बच्छाव तरउपाध्यक्षा सौ.मालुबाई युवराज भोई,पञकार श्री.प्रभाकरसर आडगाळे., सदस्य श्री.नितीन सुभाष सावंत.,विरेंद्र काशिनाथ पवार,सौ.ज्योती निंबा कोळी, शिक्षक प्रतिनिधी श्री.संजय श्रीराम बैसाणे,श्री.चंचल नागरे उप शिक्षक समिती सचिव तथा मुख्याध्यापकश्री.राजेंद्र हेमचंद चौधरी.,श्री.किसन निंबा माळी आदि ऊपस्थित होते.
