लखिमपुर नरसंहार विरोधात दोंडाईचा शहरात कडकडीत बंद पाळत दिला पाठिंबा दोडाईचा (अख्तर शाह)




दोडाईचा (अख्तर शाह)

आज ‌महाविकास आघाडीच्या वतीने उत्तर प्रदेशतील  लखिमपुर खिरी येथे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी  शांततामय पध्दतीने सुरू असलेल्या शेतकऱ्यांचा आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलकांवर भाजपाचे केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाने सत्तेच्या धुंदीत मग्न होऊन मागून हल्ला चढवला.  व त्यात सहा शेतकऱ्यांना आपला प्राण गमवावा लागला. तरी  हिटलरशाही व हुकुमशाही पध्दतीने वागणाऱ्या मोदी व योगी सरकारने  त्या शेतकऱ्यांच्या  सांत्वनासाठी  गेलेल्या काँग्रेस नेत्या मा.प्रियंका गांधी व इतर नेत्यांना काही कारण नसताना अटक केली व हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला. खरे म्हणजे ह्या प्रकरणाने जालियनवाला बाग हत्याकांडाची आठवण ताजी होते असे वाटते. याबाबत शेतकऱ्यांचा भावनांचा विचार करून निष्पापपणे हत्या करण्यात आलेल्या गरीब शेतकऱ्यांना न्याय मिळावा व केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्राने राजीनामा देऊन त्यांचा मुलगा आशिष मिश्रा याला कडक शासन होऊन त्याला फासावर लटकावे अशा आशयाचे निवेदन देण्यात आले. महाविकास आघाडीने पुकारलेल्या  हत्याकांडाचा विरोधात महाराष्ट्र बंद  घोषित करण्यात आले आहे त्या अनुषंगाने दोंडाईचा शहरात  देखील बंद ला महाविकास आघाडीच्या वतीने दोंडाईचा येथे बंद पाळत पाठिंबा दिला.  यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शाम दादा सनेर, राष्ट्रवादीचे मा.जिल्हाध्यक्ष संदिप दादा बेडसे, जिल्हा प्रमुख हेमंत साळुंखे , जि.प. सदस्य ज्ञानेश्वर भामरे  , डाॅ. रविंद्र देशमुख, रामभाऊ माणिक,  शानाभाऊ सोनवणे, दिलीप पाटील, राहुल माणिक, एकनाथ भावसार, अमित पाटील, अनिता ताई गिरासे, गिरीश देसले, आकाश कोळी, शैलेश सोनार, सचिन सोनवणे,  प.स.सदस्य राजेंद्र देवरे, दिपक दादा गिरासे.
जि. बँकेचे संचालक प्रकाश पाटील, वसंत बापु कोळी , रहिम मन्सुरी,कल्लु पठाण, समाजवादीचे उस्मानभाई अशरफी, बापु महाजन, कल्याण बागल,  राजू देशमुख, फकिरा थोरात, अजिज बागवान, हुसेन बोहरी, भैय्या सोनवणे, दादाभाई कापुरे, बापुजी मिस्तरी, राज ढोले, मोना शेख, आबा चित्ते, पप्पु सुतारे, अक्षय नगराळे, सोनु माणिक, संग्राम मोहिते, पिंटु खंडाळे, शिवा खंडाळे, आबिद शेख,  व पदाधिकारी उपस्थित होते...

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने