शिरपूर शहरात गिरासे ई मोटर्स चा शुभारंभ




शिरपूर शहर व तालुका वासियांच्या सेवेसाठी गिरासे इ मोटर या दालना चा शुभारंभ काल दिनांक 8 ऑक्टोबर रोजी सायंकाळी करण्यात आला. याप्रसंगी  आमदार काशिरामजी पावरा यांच्या शुभहस्ते  उद्घाटन सोहळा पार पडला .यावेळेस सदर प्रसंगी दादासो नरेंद्रसिंह जमादार( माजी कृषी सभापती जिल्हा परिषद धुळे ) रावसो प्रभाकर चव्हाण (माजी नगराध्यक्ष शिरपूर),भाऊ सो बबनराव चौधरी (प्रदेश उपाध्यक्ष भाजपा महाराष्ट्र), मा. श्री नरेंद्र सिंह सिसोदिया (सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती शिरपूर) ,दादा सो,सत्तारसिंग पावरा (सभापती पंचायत समिती शिरपूर) आप्पासो दिलीप लोहार, भाऊ सो किशोर माळी (तालुका अध्यक्ष भाजपा शिरपूर) भाऊ सो .हेमंत पाटील नगरसेवक शिरपूर, नाना सो जगदीश राजपूत सरपंच आमोदे, भाऊ सो हर्षल राजपूत नगरसेवक शिरपूर, भाऊ सो देवेंद्र राजपूत नगरसेवक शिरपूर, श्री .राज देशमुख माजी सरपंच आमोदा, दादासो मंगलसिंग देशमुख माजी सरपंच आमोदा, उद्योगपती श्री नंदू अण्णा गिरासे, भाऊ सो सोनू राजपूत तालुका उपाध्यक्ष भाजपा ,बापुसो नारायण चौधरी सरपंच वाठोडा ,बाबासो नितीन गिरासे ,श्री नितेंद्र राजपूत , नायब तहसीलदार शिंदखेडा, यांच्यासह मोठ्या संख्येने इतर मान्यवर उपस्थित होते.
बदलत्या काळानुसार मानवाच्या गरजा या देखील बदलत असून सध्याच्या काळात इंधनाच्या दरात होणारी भरमसाठ दरवाढ व महागाई पाहता लोकांना पारंपारिक मोटरसायकल सुद्धा आता न परवडणारी झाली आहे भविष्यात इंधनाची दरवाढ ही होतं जाणार असून जागतिक स्तरावर इंधन साठा देखील कमी होत आहे आणि म्हणून  आता इ बाईक व इ मोटर्स याकडे वळणे ही काळाची गरज ओळखून शिरपूर तालुका वासियासाठी गिरासे  इ मोटर्स नागरिकांच्या सेवेत इलेक्ट्रॉनिक बाईक आणि मोपेड ची शृंखला जॉय ई मोटर्स च्या माध्यमातून घेऊन आले आहेत .इंधनाच्या तूलनेत इ  बाइक अतिशय परवडणारी व झिरो मेंटनस असणारे वाहन असून याच्या वापराने पर्यावरणाचे रक्षणा सोबत इंधनाची देखील बचत होऊन आर्थिक खर्च कमी होणार आहे. म्हणून स्वतःमध्ये काळानुरूप बदल करून घेऊन नागरिकांनी आता ही बाईक कडे वळणें गरजेचे आहे , सन 1998 पासून जोय ई बाईक या क्षेत्रात कार्यरत असून आगामी काळात कमीत कमी दरात ग्राहकांना इ बाईक उपलब्ध करून देण्याचा कंपनीचा मानस आहे असे प्रतिपादन गिरासे मोटर्स चे संचालक विनय गिरासे यांनी केले. शिरपूर करांच्या सेवेत गिरासे मोटर्स शिरपूर फाट्यावर निळकंठेश्वर महादेव मंदिरासमोर मेन रोडला सोनालीका ट्रॅक्टर च्या शेजारी सुरू करण्यात आले असून आपल्या पसंतीची ई बाइक घेण्यासाठी एक वेळ शोरूम ला भेट द्या असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे शिवाय उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी 10 इ बाईक ची नोंदणी झाले आहे सदरचा प्रकल्प भोरखेडा येथील हिम्मतसिंग राजपूत  (सुदाम तात्या ) यांचे सुपुत्र दिलबाग राजपूत व दिग्विजय राजपूत व  यांच्या पुतण्या विनय गिरासे व त्यांच्या सहकारी मित्रांनी सुरू केला असून अधिकाधिक युवकांनी उद्योग क्षेत्रात भरारी घेऊन पुढे यावे व प्रगती करावी असे मनोगत मान्यवरांनी व्यक्त केले आहे.



Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने