शिरपूर - शिरपूर तालुक्यातील एका अकस्मात मृत्यूच्या घटनेत फिर्यादी पतीची पत्नीचा मारेकरी निघाला असून त्यास साक्ष पुराव्यांसह न्यायालयात सक्षमपणे बाजू मांडल्यामुळे तीन वर्षानंतर या गुन्ह्यातील आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की हेमराज नामदेव चव्हाण रा. तन्हऱ्हाड कसबे ता. शिरपूर जि. धुळे याने दि.१८/०२/२०१६ रोजी शिरपूर शहर पो.स्टे. ला येवुन खबर दिली की, त्याची पत्नी ज्योतीबाई हेमराज चव्हाण ही झोपेत असतांना मरण पावली आहे त्या तक्रारी वरुन शिरपूर शहर पो.स्टे ला अ.मु.र.नं. २१/२०१६ क्रि.प्रो. को क. १७४ प्रमाणे दाखल करण्यात आला होता.
सदर आकस्मात मृत्यु मधील मयताचे शवविच्छेद उप जिल्हा रुग्नालय शिरपुर येथे करण्यात आले असता तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी मयताचे मृत्यु बाबत निश्चित अभिप्राय दिलेला नव्हता. दरम्यानचे कालावधीत संबंधीत आकस्मात मृत्युचे तपासी अधिकारी यांची शिरपुर शहर पोस्टे येथुन इतरत्र बदली झाली त्यानंतर मार्च २०१९ मध्ये पोलीस निरीक्षक श्री. शिवाजी बुधवंत यांनी शिरपुर शहर पोस्टेचा प्रभारी अधिकारी म्हणून कार्यभार स्विकारला व प्रलंबीत कामात प्रकरणी कामाचा आढावा घेतला असता सदर आकस्मात मृत्यु मधील मयत हिच्या मृत्यु विषयी त्यांना सशय वाटल्याने त्यांनी संबंधीत डॉक्टराशी संपर्क साधुन त्याचेशी चर्चा केली त्यावरुन संबधीत डॉक्टर यांनी शिरपुर येथे येवून कागदपत्राची पाहणी करुन मयताचा मृत्यु हा Mannual Stragulation ( गळा दाबुन) असा दिल्याने व त्या संदर्भात सपोनि/ दिंगबर पाटील यांनी सरकार तर्फे फिर्याद दिल्यावरुन शिरपुर शहर पोस्टे येथे दि. २७/०५/२०१९ रोजी भाग-५ गु.र.नं. १४०/२०१९ भादविक ३०२ प्रमाणे आरोपी हेमराज नामदेव चव्हाण रा. तऱ्हाड कसबे ता. शिरपूर जि. धुळे याचे विरुध्द गुन्हा दाखल करून तपास पोलीस निरीक्षक श्री. शिवाजी बुधवंत यांनी स्वतः कडे घेतला. तसेच आरोपी हेमराज नामदेव चव्हाण यास अटक करून गुन्हयाचा सखोल व बारकाईने तपास करून सक्षम पुरावे प्राप्त करुन आरोपीविरुध्द मा. न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले.
सदर खटल्याचे कामकाज हे मा. श्री एजाज एच. सैय्यद, अतिरिक्त सत्र न्यायाधीश, सत्र न्यायालय क्रमांक-३, धुळे यांचे न्यायालयात होऊन साक्षी पुराव्याअंती आरोपी नामे हेमराज नामदेव चव्हाण यानेच, त्याची पत्नी ज्योतीबाई हेमराज चव्हाण हिचा गळा दाबुन तिस जिवे ठार मारल्याचे सिध्द झाल्याने मा. न्यायालयाने आरोपीतास जन्मठेप व २००० रुपये दंड, दंड न भरल्यास साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे.
सदर खटल्याचे कामकाज सरकारी वकील श्री. निलेश कलाल यांनी पाहिले असुन गुन्हयाचा तपास श्री. शिवाजी बुधवंत, पोलीस निरीक्षक, सध्या नेम स्थानिक गुन्हे शाखा, धुळे, सपोनि/ दिंगबर पाटील नेम- मालेगांव शहर यांनी केला असून त्यांना पोहेकॉ/रविंद्र माळी, पोहेकॉ/ ललीत पाटील, पोकॉ/ तुकाराम गवळी यांनी तपासकामात मदत केली आहे तसेच पैरवी अधिकारी पोकॉ/प्रदीप पाटील यांनी केसच्या सुनावणी दरम्यान कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले आहे.
Tags
news
