येवल्यात ना छगनरावजी भुजबळ यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रक्त दान शिबिर उत्साहात संपन्न.


येवल्यात ना छगनरावजी भुजबळ यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रक्त दान शिबिर उत्साहात संपन्न.          



                        नाशिक शांताराम दुनबळे.

 नाशिक,--.  येवला तालुक्यातील साताळी  येथे ना छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त म्हणजेच 74 व्या वाढदिवसानिमित्त साताळी तालुका येवला येथे नवजीवन ब्लड बँक नाशिक व भुजबळ समर्थक पदाधिकारी साताळी आयोजित भव्य रक्तदान रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून यावेळी 31 रक्तदात्यांनी आपले रक्तदान करून कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या कार्यक्रमासाठी मा. नामदार भुजबळ साहेब यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष साहेबराव मढवई, येवला विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष वसंतराव पवार, नाशिक जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन  विभागाचे सभापती संजय बनकर,  युवा नेते सुनील पैठणकर, प्रकाश वाघ, नगरसेवक दिपक लोणारी, बाळासाहेब गुंड, नवनाथ काळे,सुदर्शन खिल्लारे,भाऊराव वाळके यांच्या हस्ते उद्घाटन झाले व रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी साताळी चे माजी सरपंच भाऊसाहेब कळसकर व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्ता भाऊ काळे, प्राध्यापक पोपटराव आहेर, सामाजिक कार्यकर्ते सुरेश सोनवणे, पत्रकार कचरू अहिरे, मा उपसरपंच शहाजीराजे काळे, मेजर अरूण कोकाटे,अंबादास शिनगर, नानासाहेब कोकाटे,माजी सरपंच गोरखनाथ काळे,अभिमन्यू आहेर, रतन काळे, वेणुनाथ राजगुरू,दीपक, कोकाटे,वाल्मीक काळे,राधाकिसन आहेर, मोहनराव कोकाटे,विलास कोकाटे,सुभाष कोकाटे,बाळुकाळे,आपेक्षा कळसकर,  आदी रक्तदात्यांनी रक्तदान करून शिबीर यशस्वी केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने