राज्य शासनाने आरोग्य विभागाच्या परीक्षार्थींना मोफत तिकीट उपलब्ध करून देण्यात यावे आरोग्य छेत्रातील गट क व गट ड च्या पेपर साठी मोफत जाण्या येण्यास परवानगी मिळावी - महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष डॉ पंकज चौधरी यांची मागणी




शिरपूर - अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशन व महाराष्ट्र राज्य चे प्रदेश उपाध्यक्ष डॉ पंकज चौधरी  यांची मुख्यमंत्री साहेब व आरोग्य मंत्री साहेब यांना विनंती आहे की ज्या ज्या विद्यार्थीची आरोग्य छेत्रातील गट क व गट ड च्या पेपर साठी  मोफत जाण्या येण्यास परवानगी मिळावी. 

ज्या प्रकारे 24-09-2021 शुक्रवार या रोजी जेव्हा आपले आरोग्य मंत्री राजेश टोपे साहेबांनी ज्या प्रकारे ऐनवेळी रात्री  आरोग्य विभागाच्या गट क व गट ड च्या पेपर 25-09-2021 व 26-09-2021या रोजी होणारे   पेपर रद्ध केले.बघितलं गेलं तर गट क साठी महाराष्ट्रातले 4 लाख विध्यार्थी यांनी अर्ज केले होते त्यातले भरपूर विध्यार्थी परीक्षा केंद्र वर पोहचले होते व काही जायला निघाले होते तेव्हा आपले आरोग्य मंत्री टोपे साहेब ऐनवेळी रात्री सांगतात की पेपर रद्द झाले, हें बोलणे खूप सोपं आहे पण तेव्हा त्या विध्यार्थी यांची अवस्था काय असेल हें तुम्ही पण विचार करू शकत नाही. यातले भरपूर विध्यार्थी खूप गरीब घराण्यातले होते त्यांनी कस तरी अर्ज भरण्यासाठी पैसे जमवले होते आणि पेपर च्या केंद्र वर पोहोचले होते कोणी निघाले होते, जे विध्यार्थी  पोहोचले  होते जेव्हा त्यांना कळलं की पेपर रद्द झाले तेव्हा रात्रीच्या वेळ काहींनी बस स्टॅन्ड तर काहींनी रेल्वे स्टेशन ला रात्र काढली, खूप भयानक परिस्थिती होती  त्या विध्यार्थीयांची. 
त्यामुळे अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशन महाराष्ट्र राज्य तर्फे सरकार ला व आरोग्य मंत्री राजेश टोपे साहेबाना  विनंती आहे की ऑक्टोम्बर मध्ये होणारे आरोग्य विभागाच्या गट क व गट ड च्या पेपर साठी त्या विद्यार्धीच्या हॉल तिकीट बघून त्यांना बस असो किंवा रेल्वे त्यांना जाण्या येण्यास मोफत सवलत देण्यात यावी. असे विनंती करणारे निवेदनाची प्रत भारतीय फार्मसीच्या असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत डॉक्टर पंकज चौधरी यांनी दिले आहे.




 

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने