फार्मासिस्ट कोव्हीड योद्धा सन्मान पासून वंचित फार्मासिस्ट प्रश्नाकडे शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.
मागील दीड वर्षापासून महाराष्ट्रमध्ये कोरोनाची महामारी चालू आहे. त्यामध्ये महत्वाची भूमिका बजावणारे डॉक्टर, नर्सेस, परिचारिका वर्गानी काम केले आहे. त्यांना फ्रंटलाइन वर्कर म्हणून संबोधले आहे. परंतु फार्मासिस्ट औषध निर्माता याला वगळून इतर यांना केंद्र सरकार कडून त्यांना प्राधान्य देण्यात आले, त्यांना लसीकरण विमा, असो यासारख्या गोष्टी उपलब्ध करून दिल्या.या कोरोनाच्या महामारीत फार्मासिस्ट ही कमी नव्हता . परंतु फार्मासिस्ट चे नाव समोर आलेले नाही. बघितलं तर फार्मासिस्ट हे पडद्यामागचे खरे हिरो असून त्यांनी कोरोना महामारीत फार्मासिस्टची भूमिका म्हणून काम केले ते त्यांचे काम कौतुकास्पद आहे. मात्र त्यांच्याही कर्तव्यतत्परतेची शासनाला दखल घ्यायला हवी होती. या कडे अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशन महाराष्ट्र राज्य, डॉक्टर पंकज चौधरी प्रदेश उपाध्यक्ष यांनी लक्ष वेधले. कोरोना माहामारी मध्ये फार्मासिस्ट औषधं निर्माता, औषधं विक्रेत्यांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या कुटुंबियांना आजही दिलासा मिळाला नाही आणि फार्मासिस्ट ला कोव्हीड योद्धा घोषित केला नाही. एका महिन्यामध्ये महाराष्ट्र सरकारच्या आणि आरोग्य विभागाच्या मार्फत फार्मासिस्ट औषधं निर्माता अधिकारी आणि अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशन महाराष्ट्र राज्य संघटनेच्या माध्यमातून राज्यातील, आमदार खासदार, मंत्री, तहसीलदार यांना संघटनेच्या मार्फत पन्नास निवेदन देण्यात आली. तरी फार्मासिस्ट प्रश्नाकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मृत्यू झालेल्या फार्मासिस्ट औषधं निर्माता आणि कोविड योद्धा सन्मान या मागणीचा विचार शासनाने करावा असे आवाहन फार्मासिस्ट डॉक्टर पंकज चौधरी प्रदेश उपाध्यक्ष यांनी केला आहे.
Tags
news


