मुंबई - मुंबई येथील क्रूज वर ncb ने केलेल्या कारवाईबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित राहत असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवाब मलिक यांनी या कारवाईबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करून धक्कादायक खुलासे करणार असल्याबाबतचे वक्तव्य केले आहे.
यापूर्वी त्यांनी गुजरात मध्ये सापडलेल्या करोडो रुपयांचे ड्रग प्रकरणात एनसीबी व केंद्र गप्प का याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते आणि हे प्रकरण दडपण्यासाठीच मुंबई कृजचे प्रकरण उदयास आले का याबाबत देखील शंका उपस्थित केली होती.
मात्र आता क्रूझ वरील कारवाईबाबत नवाब मलिक धक्कादायक खुलासा करणार असून त्यामध्ये भाजपच्या बड्या नेत्यांच्या मेव्हणा देखील होता मात्र त्यास सोडून देण्यात आले असा दावा मलिक यांनी केला आहे
क्रुझवरील कारवाईमध्ये 10 लोकांना पकडले होते मात्र त्यापैकी 2 लोकांना सोडले असल्याचे समोर आले. ज्या दोघांना सोडण्यात आले त्यामध्ये भाजपच्या एका नेत्याचा मेहुणा असून याबाबतचा भांडाफोड उद्याच्या पत्रकार परिषदेत करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज दिली.
सोडण्यात आलेल्या त्या दोन लोकांना NCB कार्यालयात आणण्यात आले होते आणि काही तासांनी त्यांना सोडण्यात आले आहे. हे जाणीवपूर्वक करण्यात आले आहे. सगळा प्रकार समोर येईल म्हणून त्यांना सोडण्यात आले आहे का असा सवाल उपस्थित होत आहे. असेही नवाब मलिक म्हणाले.
भाजपचा कोण नेता आहे त्याचे नाव उद्या घोषित करणार असल्याचे सांगतानाच NCB चे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांनी मीडियाला बाईट देताना 8 ते 10 लोकांना पकडले आहे असे सांगितले होते. कारवाई करणारा एक अधिकारी असे अंदाजे उत्तर कसे काय देऊ शकतो असा सवालही नवाब मलिक यांनी केला.
भाजपाचा तो हायप्रोफाईल नेता असून त्यानेच सगळे गॉसिप केले आहे. पहिल्यांदा म्हटले की, यामध्ये राजकीय व्यक्ती आहे. त्यानंतर मग हा पॉलिटिकल कनेक्शन असणारा माणूस सुटलाच कसा असा सवाल नवाब मलिक यांनी करतानाच एनसीबीला याचे उत्तर द्यावंच लागेल असेही नवाब मलिक म्हणाले.
ष्ट्रवादीचे नवाब मलिक करणार भांडाफोड
मुंबई - मुंबई येथील क्रूज वर ने केलेल्या कारवाईबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित राहत असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवाब मलिक यांनी या कारवाईबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करून धक्कादायक खुलासे करणार असल्याबाबतचे वक्तव्य केले आहे यापूर्वी त्यांनी गुजरात मध्ये सापडलेल्या करोडो रुपयांचे ड्रग प्रकरणात एनसीबी व केंद्र गप्प का याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते आणि हे प्रकरण दडपण्यासाठीच मुंबई कृजचे प्रकरण उदयास आले का याबाबत देखील शंका उपस्थित केली होती. मात्र आता क्रूझ वरील कारवाईबाबत नवाब मलिक धक्कादायक खुलासा करणार असून त्यामध्ये भाजपच्या बड्या नेत्यांच्या मेव्हणा देखील होता मात्र त्यास सोडून देण्यात आले असा दावा मलिक यांनी केला आहे