शिरपूर : बारा बलुतेदार समाज आजही आर्थिक उन्नतीसाठी झगडतोय आहे. यांची संस्था ओबीसीच्या ५२ टक्के प्रमाणात ४० टक्क्यांच्यावर आहे. असे असूनही शासनाचे धोरण हे ओबीसींना न्याय देणारे नसून त्यांचा वापर करणारे असुन कोरोना महामारीमुळे बारा बलुतेदारांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. बारा बलुतेदार घटकातील बहुतांश जण मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करणारे आहेत. मात्र लॉकडाऊन मध्ये या बारा बलुतेदार समाजाची कामे बंद होती. त्यामुळे समाजावर आर्थिक संकट ओढवले शासनाने त्वरित बारा बलुतेदारांचे प्रश्न सोडवायला पाहिजे होते मात्र शासनाने बारा बलुतेदारांना काहीच मदत केली नाही असा आरोप महासंघाचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव दळे यांनी केला. प्रदेश बाराबलुतेदार महासंघातर्फे (दि.४ आॅक्टो ) सोमवारी शहरातील शिंपी मंगल कार्यालय येथे बैठक पार पडली त्यावेळी कल्याणराव दळे बोलत होते. अध्यक्षस्थानी विभागीय कार्यध्यक्ष एकनाथराव होते. व्यासपीठावर प्रदेश सरचिटणीस चंद्रकांत गवळी, प्रदेश कार्यध्यक्ष साहेबराव कुमावत, महासंघाचे प्रदेश संघटक ए. के. भोई, प्रदेश सह संघटक बापू येशीकर, शिंपी समाज तालुकाध्यक्ष नितीन बाविस्कर, धोबी समाज प्रदेश उपाध्यक्ष अरुण धोबी, सोनार समाजाचे नेते एम. के. भामरे, चौधरी समाजाचे नेते अर्जुन चौधरी, माहेश्वरी समाजाचे कमलकिशोर भंडारी आदि उपस्थित होते. यावेळी शिरपूर शहर कार्यकारणी जाहिर करण्यात आली शहराध्यक्षपदी प्रकाश भिका गुरव यांची निवड करण्यात आली. तसेच महिला शहराध्यक्ष म्हणून सौ. कविता बाविस्कर यांची निवड करण्यात आली. मान्यवरांचा हस्ते शहर पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. शासनाने ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी व इंपेरीकल डाटा कोर्टात सादर करुन या घटकाचे आरक्षण पुन्हा बहाल करावे, मायक्रो ओबीसीला वेगळे आर्थीक विकास महामंडळ जाहीर करावे, राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या हेरीटेज सिटी जाहीर करावी, जिवाबा महाले यांच्या जाहीर केलेल्या स्मारकाला चालना द्यावी अशी हि मागणी दळे यांनी केली. यावेळी प्रदेश सरचिटणीस चंद्रकांत गवळी, प्रदेश कार्यध्यक्ष साहेबराव कुमावत, विभागीय कार्यध्यक्ष एकनाथराव आदिंनी मार्गदर्शन केले. शहर उपाध्यक्ष रमेश चौधरी, नितीन सोनार, शहर सरचिटणीस मनोज भावसार, शहर चिटणीस अविनाश शिंपी, भरत बारी, शहर कोषाध्यक्ष सुभाष लोहार, सहकोषाध्यक्ष राजेश पगारे , शहर प्रसिध्दी प्रमुख भरत धनगर, शहर सल्लागार संजय आसापुरे, मनोज धनगर, शहर सदस्य श्रीराम बोरगांवकर, रतिलाल कुंभार, संतोष माळी, राधेश्याम भोई, अनिल बोरसे आदिंनी बैठक यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले तर सुत्रसंचालन व आभार एम. के. भामरे यांनी केले.
Tags
news
