शिरपूर - बोगस बियाणे त्यांनतर पावसाचा खंड व परतीचा अती पाऊस आणि बोंडअळीने हवालदिल झालेल्या तालुक्यातील तऱ्हाडी येथील संतप्त शेतकऱ्याने रविवारी उभ्या कपाशीच्या पिकात मेंढ्या घातल्या आहेत.
तालूक्यातील त-हाडी येथील शेतकरी रावसाहेब बोरसे व अधिकार बोरसे ह्या दोघांभावाची त-हाडी शेतशिवारात पाच एकर शेती असुन खरिपात दोन एकर कांदा तर तीन एकरात कपाशी पिकांची लागवड केली.खरिपात बोगस बियाणे,खंडित झालेला पाऊस त्यानंतर झालेली अतिवृष्टी या सर्व काळात खर्च करूनही शेतकरी तग धरून असतांना गूलाबी बोंडअळीने धुमाकूळ घातला.मजुरांकडून कपाशी वेचणीत बोंडअळीमुळे मजुरांचा खर्च ही निघत नसल्याने व अगोदर बँकेचे दोन लाखाचे कर्ज उभारून केलेला खर्च आणि हातातून गेलेली पिके यामुळे कर्ज कसे फेडावे या विवंचनेत असलेल्या रावसाहेब बोरसे यांनी संतप्त होत उभ्या कपाशीच्या पिकात मेंढ्या घातल्या आहेत
खरिपात अतीपावसानी दोन एकरातील कांदाचे उत्पादन झाले नाही,कपाशी पिकांवर आपले उत्पादन होईल या आशेत असणार्या शेतकर्याच्या कपाशी बोंडात कापसा एवजी बोंडअळीच निघत असल्याने अपेक्षित उत्पन्न निघणार नसल्याने सदर शेतकर्यावर बँकेचे दोन लाख रुपये कर्ज कसे फेडावे या विवंचनेत सतप्त होऊन आपल्या तीन एकरात जनावरे सोडून दिले,तालूक्यातील नूकसानग्रस्त शेतकर्यांना शासनाने तात्काळ मदत करावी अन्यथा यावर्षी शेतकर्याची दिवाळी आंधारात होण्याचे चिञ तालूक्यात नीर्माण झाले आहे,
Tags
news



