ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने दोंडाईचा येथे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन संपन्न



दोंडाईचा प्रतिनिधी  - दादासाहेब जेष्ठ नागरिक संघ व दोंडाईचा या संस्थेत दिनांक 1ऑक्टोबर 2021 रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन संघाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर एस. पी . गिरासे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष उत्साहात संपन्न झाला .
संघाच्या ताईसाहेब जमादार सभागृहात ज्येष्ठ नागरिकांच्या मेळावा आयोजित करण्यात आला होता. ज्येष्ठांच्या प्रबोधनात ज्येष्ठांसाठी मृत्युपत्र किंवा इच्छापत्र या महत्त्वपूर्ण विषयावर दोंडाईचा शहरातील कायदेतज्ञ एडवोकेट जतीन जगदीशभाई वाघेला यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. एडवोकेट वाघेला यांनी सदर विषयावर ज्येष्ठांना सहज समजेल अशा सोप्या व सुलभ भाषेत तपशीलवार माहिती व्याख्याना द्वारे सादर केले.
 त्यांच्या व्याख्यानाच्या समारोपात ज्येष्ठांनी उपस्थित केलेल्या शंकांचे अर्थपूर्ण परंतु मार्मिक भाषेत निरसन केले. कार्यक्रमाअंतर्गत ऑक्टोबर महिन्यात वाढदिवस असलेल्या आजीवन सदस्यांच्या आणि धुळे जिल्हा पेन्शनर शिक्षकांच्या संघ या संस्थेच्या कार्यकारिणीवर सहयोगी सदस्य पदावर नियुक्त झालेले संस्थेचे सचिव सुरेश ढोमन पाटील यांच्या अडवोकेट वाघेला यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. 
रावल जेष्ठ नागरिक संघाच्या कामकाजाच्या यशस्वी वाटचालीत विशेष योगदान देणारे संघाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर एस. पी. गिरासे सर आणि सचिव  सुरेश डी पाटील यांच्या जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त दोंडाईचा शहरातील सामाजिक सेवेत नेहमीच अग्रेसर असणारे श्रीमान अमरदास कुक्रेजा  गुरुजी यांच्या वतीने सोद्धारक शिक्षण संस्थेचे सचिव मा श्री सी.एन. भाऊसाहेब यांच्या शुभ हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची प्रस्तावना सचिव सुरेश पाटील यांनी केली वक्त्यांचा परिचय बी. झेड. पाटील यांनी करून दिला व समारोप व आभार प्रदर्शन  के. पी. गिरासे यांनी केले

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने