महा विकास आघाडी, घटक पक्ष, किसान संघर्ष समन्वय समिती च्या वतीने शिरपूर बंद चे आयोजन निषेध व निवेदन




शिरपूर प्रतिनिधी - उत्तर प्रदेश मधील लखिंपुर खेरी येथील शेतकऱ्यांवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या विरोधात आज दिनांक 11 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात महा विकास आघाडी तसेच डावे पक्ष व इतर शेतकरी संघटना यांनी संयुक्तपणे महाराष्ट्र बंदचे आयोजन केले होते त्यानुसार आज शिरपूर तालुक्यातील शिरपूर शहरात सदरचा बंद करण्यात येऊन मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला व प्रशासनास निवेदन देण्यात आले आहे.
लखीमपूर येथील घटनेत भाजपाचे केंद्रीय राज्यमंत्री अजय मिष्रा टेनी यांच्या मुलगा आशीष मिश्रा आणि त्याचे साथीदार यांनी भरधाव वेगाने गाडी चालवून व गोळीबार करून आठ आंदोलनकारी शेतकऱ्यांच्या निर्घृण खून केला आहे अशा आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे म्हणून या घटनेचा निषेध म्हणून सदर बंदचे आयोजन करण्यात आले होते .याबाबत लेखी निवेदन उपविभागीय अधिकारी शिरपूर तहसीलदार शिरपूर पोलीस निरीक्षक शिरपूर यांना देण्यात आले आहे सदरच्या निवेदनात आंदोलनकर्त्यां कडून काही मागण्या सादर केल्या आहेत
 त्यात भाजपच्या केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करावे ,या प्रकरणातील मुख्य आरोपी आशीष मिश्रा यास फाशीची शिक्षा देण्यात यावी ,शहीद शेतकरी कुटुंबातील दोन व्यक्तींना नोकरी देण्यात यावी ,शहीद शेतकरी कुटुंबाला 50 लाख रुपयांची आर्थिक सहाय्य देण्यात यावे ,जखमींना 25 लाख रुपयांचे अर्थसाह्य देण्यात यावे, सदर घटनेचा तपास चालू उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली एसआयटीने करावा, यासह साक्री येथील कामगार नेते सुभाष काकुस्ते यांच्या घरात घुसून हल्ला हल्ला करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी इत्यादी मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे .सदरच्या बंदला शिरपूर तालुक्यातून संमिश्र प्रतिसाद मिळाला असून या बंदमध्ये राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष ,शिवसेना, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष, मानवं एकता पार्टी ,सत्यशोधक जनआंदोलन, महाराष्ट्र राज्य किसान सभा ,शेतकरी विकास फाउंडेशन ,धुळे जिल्हा शेतमजूर युनियन ,बिरसा फायटर्स, बीरसा ब्रिगेड, आदिवासी आघाडी ,संभाजी ब्रिगेड धुळे जिल्हा जागरण मंच इत्यादी पक्ष व जनसंघटना यांनी पाठिंबा दिला असून त्यांचे प्रतिनिधी या वेळेस सहभागी झाले होते. उपस्थितांना किसान संघर्ष समितीचे ॲडव्होकेट हिरालाल परदेशी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख भरत सिंह राजपूत राष्ट्रवादीचे हेमराज राजपूत काँग्रेसचे उत्तम नाना मोहन पाटील ,त्यादी वक्त्यांनी संबोधन केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने