विद्रोही आदिवासी महासंघ महा राज्य औरंगाबाद यांचे मालेगांव तहसील कार्यालयात निवेदन प्रतिनिधी केशव पवार ,औरंगाबाद




 प्रतिनिधी केशव पवार ,औरंगाबाद  

आदिवासी हा या भारतदेशाचा मालक आहे असे वेळोवेळी सांगितले जाते पण याचं मालकाला आपल्या हक्काच्या जमिनीतून हटवण्याचे षडयंत्र मालेगाव तालुक्यातील प्रशासनाने चालवले आहे याचं अनुषंगाने मालेगाव तालुक्यातील हजारो आदिवासींना बेकायदेशीररित्या त्यांच्या हक्काच्या जमिनीतून बाहेर काढण्यासाठी षडयंत्र मालेगाव तालुक्यातील प्रशासनाने चालवले असलेल्याची माहिती विद्रोही आदिवासी महासंघाच्या कार्यकर्त्यांना मिळाला या घटनेची दखल घेत संघाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय दिलीप भाऊ बर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली व राज्याचे कार्याध्यक्ष सुभाष (पप्पू भाऊ) सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी मालेगाव यांना निवेदन देण्यात आले व सात दिवसांच्या आत संबंधित अतिक्रमण धारकांना कायदेशीर न्याय न मिळाल्यास अति तीव्र स्वरूपाचे घेराव आंदोलन सुरू करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
 सदर प्रकरणात आदिवासी समाजातील वनहक्क धारकांना त्यांचा हक्क मिळवून देणारच आणि खरोखरच आदिवासी देशाचा मालक आहे हे सिद्ध करणारचं असे आश्वासन  विद्रोही आदिवासी महासंघ महा राज्य यांच्या वतीने आदिवासी समाज बांधवांना देण्यात आला आहे.
यावेळी संघाचे महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख भाऊसाहेब पवार ,जिल्हा अध्यक्ष अनिल भाऊ अहिरे ,तालुका अध्यक्ष मनोज पवार, तालुका उपाध्यक्ष भाऊसाहेब माळी, तालुका संघटक हनुमंत पवार ,तालुका उपसंघटक भगवान पवार ,तालुका खजिनदार रवी भाऊ गायकवाड ,तालुका उपखजिनदार गोरख माळी, तालुका कार्याध्यक्ष भिवराव माळी ,तालुका युवा अध्यक्ष निलेश माळी ,तालुका जेष्ठ मार्गदर्शक मधूकर पगारे , आबा भाऊ पवार व हजारोंच्या संख्येने तालूक्यातील अतिक्रमण धारक  आदिवासी समाज बांधव उपस्थित होते

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने