नगर परिषद मुख्य लेखा अधिकारी यांना पाच हजार रुपयांचा दंड राज्य माहिती आयुक्त नाशिक यांची कारवाई



अहमदनगर -  अहमदनगर महानगरपालिका यांच्या मुख्य लेखाधिकारी यांनी अर्जदारास मुदतीत माहिती दिली नाही म्हणून त्यांनी दिलेला खुलासा अमान्य करत राज्य माहिती आयोग खंडपीठ नाशिक यांनी सदरील अधिकाऱ्याला 5 हजार रुपयांच्या दंड करून शास्तीची कारवाई केली आहे .
याबाबत सविस्तर वृत्त असे की माहिती अधिकार कार्यकर्ता भीका मल्हारी अमाप पो. सोनगाव ता. राहुरी जिल्हा अहमदनगर यांनी अहमदनगर महापालिकेकडे माहितीच्या अधिकारातून अर्ज 2017 साली केला होता मात्र तत्कालीन जन माहिती अधिकारी तथा मुख्य लेखा अधिकारी श्री झिरपे दिलीप रघुनाथ यांनी अर्जदारास यास अनुसरून माहिती विहित मुदतीत तसेच प्रथम अपीलाच्या या निर्णयानंतर देखील पुरवले नाही म्हणून त्यांच्याविरूद्ध माहितीचा अधिकार अधिनियम 2005 चे कलम 20 ( 1) अन्वये शास्तीची कारवाई करण्यात आली आहे .
सदर प्रकरणात जन माहिती अधिकारी यांनी खुलासा  सादर करून आयोगाचा कळवले होते की या कालावधीत मी पदावर कार्यरत नसल्याने सदरच्या अर्ज मला आढळून आला नाही मात्र आयोगाने जन माहिती अधिकारी यांच्या खुलासा अमान्य केला असून जनमाहिती अधिकारी यांच्याकडे दाखल केलेल्या अर्जाची पोच अर्जदाराकडे उपलब्ध असून देखील  यांना दोन वर्षे दोन महिने माहिती पुरवली नाही म्हणून हेतू पुरस्कृत माहिती देण्याचे टाळाटाळ केल्याचे स्पष्ट होत असल्याने ने अधिनियमातील कलम 7 (1 )च्या तरतुदींचे उल्लंघन केले म्हणून कलम 20 ( 1)नुसार शासतीची कारवाई करण्यात आले आहे. सदरची रक्कम त्यांच्या मासिक  दोन समान वेतनातून कपात करून शासकीय लेखाशीर्ष जमा करण्याची कारवाई करणे बाबत देखील आदेश देण्यात आले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने