नीरा-भीमा कारखान्याच्या वतीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे रविवारी मेळावे - 5 ठिकाणी मेळावे ! प्रतिनिधी दत्ता पारेकर




प्रतिनिधी दत्ता पारेकर 

          पुणे: शहाजीनगर (ता.इंदापूर ) येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने कार्यक्षेत्रामध्ये माजी मंत्री व कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांचे उपस्थितीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे रविवारी (दि.3) एका दिवसामध्ये 5 ठिकाणी मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. तरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी या मेळाव्यांना मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार व उपाध्यक्ष कांतीलाल झगडे यांनी केले आहे.
            या मेळाव्यांच्या माध्यमातून हर्षवर्धन पाटील हे ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधणार असून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेणार आहेत. सदरचे मेळावे पुढील पाच ठिकाणी होणार आहेत. 1) पिंपरी बु.:- विठ्ठल रुक्मिणी मंदिर - वेळ सकाळी 9 वा. 2) बावडा :- पद्मावती मंदिर - वेळ सकाळी 10.30 वा. 3) सुरवड :- श्रीकृष्ण मंगल कार्यालय - वेळ दुपारी 12 वा. 4) शहाजीनगर :- भाग्यरत्न सांस्कृतिक भवन - वेळ दुपारी 3 वा. 5) निरवांगी :- नंदिकेश्वर मंदिर - वेळ सायंकाळी 5 वा. 
      राज्य साखर आयुक्तालयाच्या परिपत्रकातील यादीत पुणे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील एकही कारखाना हा लाल लिस्ट मध्ये नाही, ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने अभिमानाची बाब असल्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार व उपाध्यक्ष कांतीलाल झगडे यांनी सांगितले. यावेळी विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, राजवर्धन पाटील, कृष्णाजी यादव, दत्तात्रय शिर्के, दत्तू सवासे, हरिदास घोगरे, प्रतापराव पाटील, दादासो घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, मच्छिंद्र वीर, बबनराव देवकर, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, संगिता पोळ, जबीन जमादार, कार्यकारी संचालक डी. एन. मरकड, शेतकी अधिकारी डी.एम.लिंबोरे उपस्थित राहणार आहेत

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने