पुणे: बावडा येथे माजी मत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते रॉयल गोल्ड चहा पॉईंटचे उदघाट्न गुरुवारी (दि. 2) उत्साही वातावरणात करण्यात आले. युवकांनी कल्पकतेने विविध व्यवसायांमध्ये उतरून कष्ट व जिद्दीच्या जोरावर प्रगती साधावी, असे आवाहन हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी केले.
रहीमभाई तांबोळी व कुटुंबियांनी बावडा पोलीस दुरुक्षेत्र नजीक रॉयल गोल्ड चहा पॉईंटचे दुकान चालू केले आहे. उदघाट्न प्रसंगी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी तांबोळी कुटुंबियांशी असलेल्या ऋणानुबंधाचा उल्लेख केला.
या कार्यक्रमास नीरा भीमा कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील, मयूरसिंह पाटील, विकास पाटील, सरपंच किरण पाटील, उपसरपंच निलेश घोगरे, ग्रामस्थ व मुस्लिम बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.
Tags
news
