दौंड पंचायत समिती उपसभापती पदी विकास कदम यांची बिनविरोध निवड, निशाताई शेंडगे यांच्या निवडीकडे यवत गणाचे लक्ष




दौंड

 दौंड पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती निवडणुकीची जोरदार चर्चा सुरू असताना काल लिंगाळी गणातील पंचायत समिती सदस्य विकास कदम यांची उपसभापती बिनविरोध निवड झाली.यावेळी प्रांतधिकारी प्रमोद गायकवाड,गटविकास अधिकारी अजिंक्य येळे, दौंड तालुका रा. काँग्रेसचे अध्यक्ष आप्पासाहेब पवार, दौंड पंचायत समितीच्या सभापती सौ. हेमलता फडके, मावळते उपसभापती सयाजी ताकवणे, सदस्य नितिन दोरगे,आरपीआय पुणे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र कांबळे, बहुजन रयत परिषदेचे प्रदेशाध्यक्ष आबासाहेब वाघमारे,बादशाभाई शेख, गुरूमुख नारंग,  सर्व पंचायत समिती सदस्य विविध पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित  होते.
लवकरच  जिल्हा परिषद , पंचायत समिती निवडणूक होत असुन शेवटच्या काही महिन्याचा कार्यकाळ शिल्लक राहिला सभापती व उपसभापती पदाची ही अखेरची खांदे पालटाची संधी  कोणाला मिळणार  याकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागले होते.
दौंड पंचायत  समितीवर राष्ट्रवादी  काँग्रेसची एकहाती सत्ता असुन 12 पैकी 11 सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे तर एक सदस्य भाजपचा आहे.
सभापती पदाच्या निवडीकडे आता सर्व तालुक्याचे लक्ष लागले आहे. 
सभापतीपदासाठी यवतच्या निशा शेंडगे या प्रबळ दावेदार असल्याचे बोलले जात आहे. 
ह्या पाच वर्षांत दौंड पंचायत समितीवर १२ पैकी ११ सदस्यांना संधी मिळाली असून फक्त यवत गणाला संधी मिळणे बाकी आहे अनेक वर्षापासून यवत गणाला संधी न मिळाल्याने यावेळी तरी यवत ला संधी मिळेल आशी नागरिकांमध्ये चर्चा चालू होती सभापती पदासाठी मीना धायगुडे, ताराबाई देवकाते , आशा शितोळे, व विदयामान सभापती हेमलता फडके या महिलांना संधी मिळाली असुन यवत गणातील निशा  शेंडगे या सभापती पदासाठी वंचित राहिल्या असुन सर्वांना समान संधी देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून यावेळी यवत गणाला नक्कीच संधी मिळेल अशा भावना सौ. निशा निलेश शेंडगे यांनी यावेळी व्यक्त केल्या.
सभापती  पदाची संधी नक्की कोणाला मिळते  याकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने