चाळीसगाव येथिल खान्देश स्तरीय सत्यशोधक परिषदेला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे : गणेश खलाने




शिंदखेडा : दि.26/9/2021 रोजी  चाळीसगाव येथे होत असलेल्या १४८ व्या सत्यशोधक समाज वर्धापन दिनानिमित खान्देश स्तरीय सत्यशोधक परिषदेचे  आयोजन करण्यात आले आहे.  खान्देश स्तरीय सत्यशोधक परिषदेचे दि. २६/९/२०२१ वार रविवार रोजी सकाळी १० वाजता ठिकाण : वैभव मंगल कार्यालय, भडगाव रोड, चाळीसगाव येथे दोन सत्रात परिषदेचे आयोजन केले आहे.  या परिषदेचे उद्घाटन मा. प्रतिभा शिंदे तर दुसर्या सत्राचे उद्घाटन मा. बाळासाहेब कर्डक यांच्या हस्ते होणार आहे.  तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. अनिताताई देवतकर, व मा. गोपीनाथ लोखंडे हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात खास विषय : नवीन कृषी विधेयक २०२० काय आहे? व हे कृषी विधेयक नेमके कुणाच्या हिताचे? आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२० कुणाच्या हिताचे? या विषयावर वक्ते  ॲड. राहुल वाघ, धुळे व डॉ. सिद्धार्थ घाटविसाचे, मुंबई, प्रा.  प्रशांत बोबडे, प्रा. डॉ. प्रभाकर गायकवाड  हे मार्गदर्शन करणार आहेत.  
     तरी समस्त सत्यशोधक  समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन परिषदेचे शिंदखेडा येथील शहर अध्यक्ष गणेश खलाने,दिनेश माळी(मा.नगरसेवक)ॲड.  
चंद्रकांत बैसाने,किरण जाधव,कैलास वाघ ,पितांबर सोनवणे ,दीपक विश्वेश्वर, कल्पेश सोनवणे, अनिल माळी सर प्रविण माळी योगेश माळी वासुदेव माळी कृणाल माळी,आदीनी आवाहन केले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने