बभळाज / प्रतिनिधी
बभळाज तालुका शिरपूर येथील उपसरपंच पदाच्या निवडीसाठी ग्रामपंचायत सरपंच जगन्नाथ महाजन यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली उपसरपंच धाकू पौलाद भील यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी अनिल त्रिभुवन यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा ग्रामसेवक विजय पाटील यांनी केली.अनिल त्रिभुवन सा.दिव्य नागेश्वर परिसरचे संपादक आहेत. या वेळी सरपंच जगन्नाथ महाजन, सौ.सरला राजपुत,सौ.कलाबाई मराठे,सौ.आशाबाई पाटील,सौ.सुरेखा चौधरी,सौ.भिकुबाई भिल,किशोर गुजर,धाकु भील,देवा बंजारा,कशिराम ठैलारी,अजमल पवार ग्रामसेवक रमेश जाधव उपस्थित होते. अनिल त्रिभुवन यांची उपसरपंचपदी निवड झाल्याने नातेवाईक, मित्र परीवार, ग्रामस्थ व तालुक्यातील पत्रकार या सर्वांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Tags
news

