राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉक्टर मनोज महाजन यांच्या कोरोना योद्धा म्हणून सन्मान
कोरोना काळात केलेल्या समाज कार्याची दखल
शिरपूर - दि. 3 सप्टेंबर रोजी NATIONAL HUMAN RIGHTS AND HUMANITARIAN FEDERATION या भारत सरकार कडे नोंदणीकृत व WHO संलग्न तसेच अंतरराष्ट्रीय स्तरावरील ISO प्रमाणित संस्थेकडून शहराध्यक्ष (रा.कॉ.पा.) शिरपूर - डॉ. मनोज महाजन यांचा “CORONA WARRIOR” प्रमाणपत्र देऊन कोविड-१९ परिस्थितीमध्ये त्यांनी दिलेल्या योगदाना बद्दल सन्मान करण्यात आला.
शिरपूर शहराध्यक्ष डॉ. मनोज महाजन यांनी त्यांच्या होमिओपॅथीक वैद्यकीय महाविद्यालय व संस्थेच्या माध्यमातून कोविड-१९ परिस्थितीमध्ये आयुष मंत्रालय, नवी दिल्ली व केंद्रीय होमिओपॅथी परिषद व संशोधन परिषद, नवी दिल्ली यांचेकडून कोविड आजार निवारणासाठी जाहीर करण्यात आलेल्या निर्देशानुसार रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी अर्सेनिक अल्बम ३० सी (Arsenic Album 30 C) या औषधीचे वाटप शहरातील प्रत्येक प्रभागात तसेच शहर व परिसरात घरोघरी भेट देऊन प्रत्येक व्यक्तींची नोंदणी करून सदर औषधीचे वाटप अभियान राबविण्यात आले होते. त्यांच्या संस्थेमध्ये स्वतंत्र इम्युनिटी क्लिनिक स्थापन करून कोरोना रुग्णांना कोरोना प्रतिबंधात्मक होमिओपॅथीक औषधीचे मोफत वितरण केलेले आहे व त्यांचे कार्य आजपर्यंत सुरु आहे. कोरोना कालावधी मध्ये शहर व परिसरात रुग्णांचे समुपदेशन करून त्यांचे मनोबल वाढविणे व कोरोना आजाराबाबत जन माणसामध्ये जागृती करणे साठी त्यांनी विविध शिबिरांचे आयोजन केलेले होते. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन NATIONAL HUMAN RIGHTS AND HUMANITARIAN FEDERATION या संघटनेकडून त्यांचा कार्याचा गौरव करण्यात आला. संघटनेचे ठाणे जिल्हा सचिव डॉ. वसिम आर के व अध्यक्ष भिवंडी मोमीन उमर तसेच शिरपूर येथील सदस्य डॉ. भदाणे खुशवंत यांनी डॉ. मनोज महाजन यांना “कोरोना योद्धा” प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करून त्यांनी केलेल्या कार्याचा सन्मान केला. या प्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते श्री. हेमराजभाऊ राजपूत, तालुकाध्यक्ष श्री. शिरीष दादा पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य,शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
Tags
news