राजपूत समाजातील युवकांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या- क्षत्रिय राजपूत समाज शिरपूर तालुक्याच्या वतीने निवेदन




शिरपूर प्रतिनिधी - शिंदखेडा तालुक्यातील दराने गावातील तरुण युवक डॉ.प्रेमसिंग गिरासे यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी फास्ट ट्रॅक कोर्टात सदरच्या खटला चालून ज्येष्ठ सरकारी वकील एडवोकेट उज्वल निकम यांची शासनाने नियुक्ती करावे या मागणीसाठी आज दिनांक 13 सप्टेंबर रोजी क्षत्रिय राजपूत समाज शिरपूर तालुका यांच्या वतीने तहसीलदार शिरपूर यांना निवेदन देण्यात आले .
याबाबत वृत्त असे की शिंदखेडा तालुक्यातील दराने येथील तरुण डॉ. प्रेमसिंग गिरासे वय 21 यांच्या चिमठाणा दराने रोडवर दि. 06 सप्टेंबर रोजी चोरट्यांनी निर्दयपणे हत्या केली आहे सदर प्रकरणात जरी आरोपी पोलिसांच्या हाती लागले असले तरी सदर आरोपींच्या विरोधात सक्षम पणे बाजू मांडून सदरच्या खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी म्हणून निवेदन देण्यात आले आहे.
 डॉक्टर गिरासे यांचे आई-वडील मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत असून त्यांचे संपूर्ण कुटुंब डॉक्टर युवकांवर अवलंबून होते घरात एक लहान बहीण आहे वडिलांना किडनीचा त्रास आहे अशा बिकट परिस्थितीत जीवन जगणार्‍या कुटुंबाच्या आधार या घटनेमुळे हरपला आहे त्यामुळे शासकीय पातळीवरून सदर पीडित कुटुंबाला मदत करण्यात यावी अशी देखील मागणी करण्यात आली आहे.
शिंदखेडा तालुक्यातील ही घटना म्हणजे राजपूत समाजाला फार मोठा आघात असून या तरुणाने घेतलेली  मोटर सायकल आणि मोबाइल चोरी करण्यासाठी या आरोपींनी धारदार शस्त्राचा वापर करून त्यांची हत्या केली आहे सदरची घटना अंगावर शहारा आणणारी आणि अतिशय निर्दयपणे क्रूर वागणुकीची आहे यातील गुन्हेगार हे सराईत गुन्हेगार असून विविध गुन्ह्यांमध्ये ते हद्दपार झाले आहेत त्यामुळे अशा प्रकारच्या समाजकंटकांवर कठोर कारवाई होण्यासाठी शासनाने ज्येष्ठ सरकारी वकील एडवोकेट माननीय श्री उज्वल निकम यांची या प्रकरणात नियुक्ती करून राजपूत समाजातील या पीडित कुटुंबाला न्याय द्यावा अशी मागणी समस्त शिरपूर तालुका क्षत्रिय राजपूत समाजातर्फे करण्यात आली आहे. शिवाय याबाबत न्याय मागण्यासाठी आंदोलन करणाऱ्या समाजातील युवकांवर दाखल झालेले गुन्हे देखील मागे घेण्यात यावे अशी देखील मागणी करण्यात आली आहे
याप्रसंगी नरेंद्र सिंह सिसोदिया, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, नगरसेवक चंदन सिंग राजपूत ,नगरसेवक राजेंद्र सिंह राजपूत, नगरसेवक हर्षल भाऊ राजपूत ,माजी पंचायत समिती सभापती जगत सिंग राजपूत, शिवसेनेचे राजू टेलर, शिवसेना जिल्हा उप प्रमुख भरतसिंग राजपूत ,वाठोडा सरपंच नारायण बापूजी, भोरखेडा माजी सरपंच महेंद्र सिंग राजपूत, भरत सिंह राजपूत, माजी काँग्रेसचे अध्यक्ष नितीन बाबा गिरासे, नगरसेवक देवेंद्र राजपूत, डॉ.दीपक राजपूत, डॉ.योगेश जाधव ,प्रमोद पाटील, देवेंद्र सिसोदिया, पत्रकार महेंद्र राजपूत ,पत्रकार अमोल राजपूत, एडवोकेट गोपालसिंग राजपूत, माजी सरपंच नांथे, महेंद्र सिंग राजपूत ,भरत सिंह ,राजपूत भरत सिंग गिरासे,  डी .जे राजपूत, जयसिंग पाटील ,संजय चौधरी, दिनेश चौधरी , कल्पेश सिंह राजपूत ,जय सिंग राजपूत राजपूत मयूर राजपूत राज सिसोदिया इत्यादी समाजबांधव या वेळेस उपस्थित होते

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने