मुंबई - 'जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा' ही म्हण आपण नेहमीच ऐकतो.
पण फक्त आणि फक्त जनसेवेसाठी जी माणसं जगतात त्यांचे काम, कर्तृत्व हे नक्कीच अलौकिक ठरते .
'आमचे जीवन जनसेवेसाठी' या कार्यक्रमाद्वारे डॉ.मीनलजी भोळे संचलित ' *सोहम कला गुणगौरव अकादमी' मुंबई* यांनी आर. एस. पी. चे श्री.अरविंद देशमुख ,महासमादेशक- (महाराष्ट्र राज्य) यांच्याशी सुसंवाद साधला.
मुळात आर. एस. पी. म्हणजे काय? रस्ता सुरक्षा का केली पाहिजे ?वाहतुकीचे नियम कसे पाळावेत? एका शिक्षकाच्या माध्यमातून आर. एस. पी. ची भूमिका काय असायला हवी? विद्यार्थी, शिक्षक, पालक यांचा त्रिवेणी संगम आर. एस. पी. च्या माध्यमातून कसा साधला जातो ? या आणि अशा अनेक प्रश्नांच्या माध्यमातून आर.एस.पी. ची सखोल माहिती उपस्थित प्रेक्षकांना, विद्यार्थ्यांना मिळाली.
या कार्यक्रमाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे राज्यभरातून आर.एस.पी. चे पदाधिकारी,शिक्षक यांचा गणवेशात उत्स्फूर्त सहभाग व
त्यांनी दिलेल्या दिलखुलास प्रतिक्रिया.कोरोनाच्या आपत्ती काळात कोरोना योद्धा म्हणून कार्यरत असलेल्या सर्व सदस्यांचे सरांनी कौतुक केले.तसेच सोहम अकादमीच्या माध्यमातून आर.एस.पी.च्या कार्यकर्तृत्वाचा अनमोल ठसा राज्यभर उमटवता आला यासाठी सोहम अकादमीचे कौतुक करून आभार मानले. सोहम अकादमीच्या संकल्पक असणाऱ्या डॉ. मीनल मॅडम व त्यांची टीम यांनी हा अनोखा वेबिनार घडवून आणला म्हणून उपस्थितांनीही डॉ. मीनलमॅडम चे आभार मानले .त्याचबरोबर आमची अकादमी नेहमीच विद्यार्थी-शिक्षक हिताय कार्यक्रम करते याचा उल्लेख करायला देखील मॅडम विसरल्या नाहीत.
या कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन श्री .राजेंद्र पाटील सर यांनी केले, तर त्यांना श्रीमती प्रिया उपासनी, समीक्षा तावडे, प्रीती उरणकर, श्री.इम्रान शेख सर यांची साथ लाभली.कार्यक्रमासाठी
तंत्रस्नेही गायत्री मेहेत्रे यांचे विशेष योगदान लाभले.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हा कार्यक्रम पोहोचवावा या प्रेमळ आग्रहावर कार्यक्रमाची सांगता झाली.
Tags
news
