आत्महत्या करत असल्याचा डॉक्टर महिलेचा पोलिसांना मेसेज; तपासानंतर समोर आली धक्कादायक माहिती......... प्रतिनिधी दत्ता पारेकर



 
प्रतिनिधी दत्ता पारेकर 
पुणे:पिंपरी-चिंचवडमध्ये एका डॉक्टर महिलेने एका अतिवरिष्ठ अधिकाऱ्याला आपण आत्महत्या करत असल्याचे मेसेज करुन सांगितल्याने मोठी खळबळ उडाली होती. 
तणावाखाली असलेल्या या महिला डॉक्टरने आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलले होते. 
मात्र पोलिसांनी वेळीच या महिलेला रोखल्याने मोठा प्रसंग टळला आहे.
 या महिलेचा फोटो आणि मोबाईल क्रमांक वापरून खोडासळपणा करण्यात आल्याचं समोर आलं आहे. 
कॉलगर्ल या नावाने डॉक्टर महिलेचा फोटो एका वेबसाईटर टाकण्यात आला होता. 
कॉलगर्ल असे सर्च केले असता संबंधित महिला डॉक्टरचा फोटो आणि मोबाईल क्रमांक येत आहे. अनेक जण त्यांना फोन करत असल्याचेही आता समोर आले आहे.
 त्यानंतर या महिलेने आत्महत्येचे पाऊल उचलले होते.
 पोलिसांच्या माहितीनुसार, 
या सर्व प्रकारामुळे ही महिला तणावात होती. 
त्यामुळे तीने  दुपारी अतिवरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना मी आत्महत्या करत असल्याचा मेसेज केला. 
आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी तातडीने जाऊन डॉक्टर महिलेची समजूत काढली आणि तिला आत्महत्येपासून परावृत्त केले आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 
डॉक्टर महिलेचा फोटो आणि मोबाईल नंबर हा कॉलगर्ल म्हणून एका वेबसाईटवर टाकण्यात आला आहे.
  कॉलगर्ल असे गूगलवर सर्च करताच संबंधित महिलेचा फोटो आणि मोबाईल नंबर येतो असे पोलिसांनी सांगितले. 
अनेकदा या महिलेला त्याबाबत अनेक फोन देखील आले आहेत. 
यामुळे ही महिला तणावात होती. त्यामुळे तिने  दुपारच्या सुमारास आत्महत्या करत असल्याचा मेसेज पोलीस अधिकाऱ्यांना केला होता. 
याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोनपे आणि महिला पोलीस अधिकारी कविता रुपवनर यांना देण्यात आली.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने