चोरीचा गुन्हा उघड करण्यात शिरपूर तालुका पोलिसांना यश आरोपींसह मुद्देमाल जप्त




शिरपूर प्रतिनिधी -  शिरपूर तालुक्यातील तालुका पोलिस स्टेशन सांगवी येथील पोलीस उपनिरीक्षक सुरेश शिरसाठ व त्यांच्या पथकास चोरीच्या गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करून आरोपी पकडण्यात यश आले आहे .
याबाबत सविस्तर वृत्त असे की तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दहिवद शिवारातील आरणा कॉटस स्पिन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या सुरू असलेल्या बांधकामावरून चोरट्यांनी एकूण 200 किलो वजनाच्या लोखंडी सळइचा रिंगचा माल चोरून नेला होता. याबाबत दिनांक 21 ऑगस्ट रोजी तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास कामी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाट यांनी एक पथक स्थापन करून चोरट्यांचा शोध सुरु केला होता, तपासादरम्यान गोपनीय बातमीदार मार्फत मिळालेल्या माहितीनुसार काही संशयित व्यक्तींबाबत माहिती काढण्यात आली व त्यांची चौकशी सुरू करण्यात आले त्यावरून संशयित नामे सुनील गंगा पावरा, दारासिंग अमाशा पावरा, किरण नारायण भील सर्व राहणार दहिवद  तालुका शिरपूर जिल्हा धुळे यांना अटक करण्यात आली वरील आरोपींनी गुन्ह्याची कबुली देत सर्वांच्या चोरीचा माल सुनीता अर्जुन पावरा राहणार दहिवद तालुका शिरपूर विक्री केल्याचे कबूल केले व पोलिसांनी तिच्या कडून चोरीचा माल देखील जप्त केला आहे .
सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित सो, अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत बच्छाव सो,उपविभागीय पोलिस अधिकारी  अनिल माने सो, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश शिरसाठ पीएसआय खैरनार, वारे व पोसइ करणकार, असई नियाज शेख, पो.कॉ.हेमंत पाटील ,संजय देवरे ,सइद शेख, योगेश मोरे ,प्रकाश भिल इत्यादींच्या पथकाने केली आहे.


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने