धुळे-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.शरद पवार, महाराष्ट्र प्रदेश राज्य अध्यक्ष जयंत पाटील, विधिमंडळ गटनेते मा.ना.अजित पवार , मा.ना. छगनराव भुजबळ यांना अभिप्रेत असणारी संघटना बांधण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश ओ बी सी प्रदेश अध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओ.बी.सी. विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी प्रांतिक तैलिक महासभेचे धुळे जिल्हा अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी धुळे जिल्हा माजी अध्यक्ष व धुळे महानगरपालिकेच्या माजी स्थायी समिती सभापती कैलास काळू चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली. सदर नियुक्ती धुळे येथील राष्ट्रवादी भवन येथे झालेल्या ओ.बी.सी परिषदेत ओबीसीचे नेते मा.ना. छगनराव भुजबळ यांच्या हस्ते देण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओ.बी.सी सेलचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ईश्वर बाळबुधे , महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सरचिटणीस इर्शाद जहागीरदार, उत्तर महाराष्ट्र ओबीसी सेल प्रभारी उमेश नेमाडे, ओबीसी प्रदेश सरचिटणीस तथा धुळे जिल्हा निरीक्षक गिरीश भामरे, धुळे जिल्हा अध्यक्ष किरणन शिंदे, माजी जिल्हा अध्यक्ष संदीप बेडसे, धुळे शहर अध्यक्ष रणजित भोसले, धुळे तालुका अध्यक्ष राजेंद्र चितोडकर, डॉ.जितेंद्र ठाकूर , दिनेश मोरे,अल्पसंख्याक सेल महिला अध्यक्ष शकीलाताई बक्ष, जयाताई साळुंखे, ज्योतीताई पावरा, सरोजिनीताई कदम, एजाज खाटीक, रजनीश निंबाळकर, उमेश महाले, एन.सी.आबा पाटील, आरिफ मुजावर, सुमित पवार, कुणाल पवार, ओबीसी सेल शहरअध्यक्ष ज्ञानेश्वर माळी, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष कुंदन पवार, शकील खाटीक, विजय पाटील, ईश्वर माळी, श्रीकांत नेरकर, विजय लहामंगे, प्रवीण पाडवी, भुषण माळी, विजय शिरसाठ, भारत वाकडे, आसिफ शेख, नरेंद्र सोनवणे, राजेंद्र गांगुर्डे, अतुल अहिरराव, उमेश पाटील, अस्लम खाटीक, आनंदा चौधरी, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी राज्य उपाध्यक्ष कैलास चौधरी यांनी सांगितले की, पक्षाने माझ्या वर जो विश्वास व्यक्त केला व जी राज्य पातळीवरील जबाबदारी दिली त्याबद्दल पक्षाच्या नेतृत्वाचे मनापासून आभार मानतो व मला दिलेली जबाबदारी तसेच ओबीसी व पक्षाच्या संघटन करिता मनापासून योगदान देईल व वरिष्ठांचा विश्वास सार्थकी ठरवेल.
Tags
news
