नाशिक - विघ्नहर्त्या गणरायाच्या आगमनाने दहा दिवस वातावरण चैतन्याने भारलेले होते. गणेशोत्सवानिमित्त यंदा शाडूमातीच्या गणपती मूर्तींची मोठ्या प्रमाणावर प्रतिष्ठापना झाल्याने पर्यावरणपूरक विसर्जनालाही गणेशभक्तांकडून चांगला प्रतिसाद मिळाला
गणेश विसर्जनासाठी यंदा मनपाच्यावतीने परिसरात सात ठिकाणी कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली होती. तर पहिल्यांदाच फिरत्या तलावाची संकल्पना राबविण्यात आल्याने , निर्माल्यासाठीही त्यासोबतच व्यवस्था करण्यात आली होती. मनपा नवीन नाशिक विभागाच्या वतीने गणेश विसर्जनासाठी गोविदनगर येथील जिजाऊ महिला सभागृह , छत्रपती व्यायामशाळा जुने सिडको , पवननगर येथील जलकुंभ , राजे संभाजी स्टेडियम , मिनाताई ठाकरे शाळा कामठवाडे , डेकेअर शाळा व पिंपळगाव खांब येथे कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली होती . यासाठी 3 डम्पर , 7 ट्रॅक्टर संकलीत मूर्ती व निर्माल्य वाहतूक करण्यासाठी ठेवण्यात आले होते यंदाच्या वर्षी मूर्ती विसर्जन करण्यासाठी फिरत्या तलावाची संकल्पना पहिल्यांदाच राबविण्यात आली. होती टँक ऑन व्हील उपक्रमांतर्गत एकूण सात सोसायट्यांमध्ये विसर्जनाची सोय करण्यात आली होती तसेच 182 नागरिकांनी अमोनियम बायकार्बोनेट घरी घेऊन जात विसर्जन केले या वेळी सिडको विभागात एकूण 19 हजार 436 मूर्ती संकलित करण्यात आल्या
विभागीय अधिकारी डॉ . मयूर पाटील यांच्या मागदर्शनात बांधकाम विभागाचे ए.जे.काझी , आरोग्य विभाग संजय गांगुर्ड , पाणी पुरवठा विभागाचे गोकुळ पगारे तर विद्युत विभागाचे प्रकाश मोरे व गिते, स्वच्छता निरीक्षक दीपक बोडके, राजाभाऊ गायकर ,यांच्यासह सुमारे सव्वाशे मनपा कर्मचारी नेमण्यात आले होते अनुचित प्रकार घडू नये यासाठी वपोनी कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी परिसरात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता
Tags
news
