कोराना नंतर शिरपूर तालुक्यावर डेंगू मलेरिया चे संकट , शहरात रुग्ण संख्येत वाढ, प्रशासनाकडून ठोस उपाययोजनांची गरज




शिरपूर - राज्यात आलेल्या कोरोना संकटात शिरपूर तालुक्यातून अनेकांनी आपले प्राण गमावले असून अनेक कुटुंबांचे आधार हरपल्याने फार मोठी हानी झाले आहे. कोरोणाच्या पहिली आणि दुसरी लाट यातून बाहेर पडत जनजीवन सामान्य होत असतानाच प्रशासन कोरोणाच्या तिसऱ्या लाटेच्या धोक्याबाबत सुचित करत आहे. अजूनही जनजीवन पूर्णपणे सामान्य झालेले नाही ,शाळा कॉलेजेस व इतर सार्वजनिक कार्यक्रमांवर आजही बंधने आहेत या सर्व प्रकराच्या संकटातून शिरपूर तालुका बाहेर येत नाही तोवर तालुक्यावर साथीच्या रोगांच्या प्रादुर्भाव वाढत असून शिरपूर शहरासह तालुक्यात डेंगू मलेरिया सारख्या साथीच्या आजारांनी आपले पाय पसरवण्यास सुरुवात केली असून रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे .जनतेला सर्दी, खोकला ,ताप ,प्लेटलेट कमी होणे इत्यादी लक्षणे जाणवत असून अनेकांना डेंग्यूसदृश आजाराची देखील लागन झाले आहे. ग्रामीण भागात 150 पेक्षा अधिक रुग्णांची नोंद असून शिरपूर शहरात देखील बाधितांच्या आकडा शंभरी पार गेला आहे. ही जरी सरकारी आकडेवारी असली वास्तविकता मात्र यापेक्षा फार वेगळी आहे कारण सर्वच लोक सरकारी उपकेंद्र किंवा दवाखान्यात उपचार घेत नसून अनेकांचा कल हा खाजगी दवाखान्यात जाऊन उपचार घेण्याकडे असतो त्यामुळे खाजगी दवाखान्यात रुग्णांची संख्या किती याचा अंदाज लावणे कठीण असून बाहेरील परिस्थितीचा आढावा घेतला असता सर्वच हॉस्पिटल्समध्ये रुग्ण संख्यांच्या वाढ होऊन बेड मिळणार नाही ही इतकी दयनीय परिस्थिती येऊन ठेपले आहे. त्यामुळे जनतेने कोरांना विरुद्धच्या लढ्यात जीव वाचवला खरा पण आता त्यांच्यावर साथीच्या रोगांचा विळखा घट्ट होत आहे. ढासळलेली आर्थिक परिस्थिती, महागाईने मोडलेले कंबर, बेरोजगारी आणि जनतेवर आलेले अस्मानी आणि सुलतानी संकट यामुळे जनजीवन अस्ताव्यस्त झाले असून जगणे असह्य झाले आहे .अशा परिस्थितीत प्रशासनाने तात्काळ आरोग्य सुविधांवर भर देत लोकांना डॉक्टर्स ,बेड उपलब्ध होतील याकडे प्राधान्याने लक्ष देण्याची गरज असून साथीचे आजार पसरण्याची मूळ कारणांचा शोध घेऊन  डासांची उत्पत्ती थांबण्यासाठी व प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने ठोस प्रयत्न करून उपाययोजना करण्याची गरज आहे. पंचायत समिती स्तरावरून आरोग्य विभागाने गावोगावी उपकेंद्रांना सूचना केल्या असून फवारणी व स्वछता, सारख्या उपाय योजना केल्या जात असल्या तरी ते आज कमी पडत आहेत .


शिरपूर शहरात देखील रुग्ण संख्या  शतकी पार गेला ने लोकांच्या चिंतेत भर पडली असून नगरपरिषदेने सुद्धा फक्त गाडी फिरून लोकांना सूचना करून व सावध करून काही साध्य होणार नाही तर जनजागृती सोबत प्रत्यक्षात कृती करून उपायोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे. आणि आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेऊन ठोस उपाय योजना करण्याची गरज आहे तरच या साथीच्या आजारांवर प्रतिबंध लावता येऊ शकत अन्यथा यात वाढ झाल्यास पुन्हा लोकांच्या जीवितास व आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शाही थाटामाटात राजकीय नेत्यांचे अवभगत करण्याच्या कार्यक्रम संपला असेल तर किमान जनतेच्या प्राथमिक गरजा, स्वच्छता आरोग्य सेवा याकडे जन प्रतिनिधींनी प्राधान्याने लक्ष द्यावे स्मार्ट शहरात आरोग्य व्यवस्था देखील स्मार्ट व्हावी हीच जनमानसाची भावना आहे. कॅमेर्‍यांची झगमगाट ,फोटोंच्या फ्लॅश, बातम्यांची प्रसिद्धी ,कर्तुत्वाचे मोठे मोठे लेख आणि जाहिरातींच्या प्रसार करून नेत्यांनी वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर जरूर स्थान मिळवावे परंतु दिव्याखाली अंधार अशी परिस्थिती निर्माण होऊ देता सामान्य जनतेला आरोग्य व्यवस्थेची कमी भासणार नाही आणि दवाखान्यात गेल्यावर किमान बेड मिळेल याची शाश्वती द्यावी हीच सामान्य जनतेची अपेक्षा आहे.


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने