आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त अरुणा पवार यांचा अंचाडे तांड्यातील ग्रामस्थांनी केला सत्कार



धुळे तालुक्यातील अंचाडे तांडा येथील जि.प.शाळेतील शिक्षिका श्रीमती. अरुणा पवार यांना नुकताच जि.प.वतीने आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त झाला.शिक्षिका श्रीमती,अरुणा पवार यांनी कोरोना काळात ३६५ दिवस शाळा सुरू ठेवली.व विद्यार्थ्यांना घरोघरी जाऊन शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले,त्यांचा या कार्याची दखल घेऊन त्यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त झाला.त्यांच्या या कार्याने गावाचेही नाव उज्वल झाले,असे मनोगत नरेंद्र जाधव यांनी व्यक्त केले. गावकऱ्यांनी श्रीमती.अरुणा पवार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.यावेळी गुलाब जाधव,संतोष टेलर,अनिल जाधव, दिनेश जाधव,नरेंद्र जाधव,कणीलाल जाधव,विनोद जाधव,छोटू जाधव,श्याम पवार,रवी जाधव,भूषण जाधव,मोहन जाधव,लखन जाधव,गोरख जाधव,छगन जाधव,डॉ.प्रविण साळुंके,उपस्थित होते,या कार्यक्रमात  भूमिका पाटील यांनी आभार मानले,

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने