दराने ता. शिंदखेडा जि. धुळे येथील चि. डॉक्टर प्रेमसिंह गिरासे वय 21 वर्ष या तरुण युवकाचा युवकाचा 6/9/2019 रोजी पोळा या सणाच्या दिवशी राज्य महामार्गावर चिमठाणे गावाजवळ भर दुपारी 3 वाजेच्या दरम्यान खलाणे गावातील संशयित गुन्हेगार यांनी डॉ. प्रेमसिंग गिरासे यांची मोटर सायकल भररस्त्यात अडवत धारदार शस्त्राने वार करत,जबर प्राणघातक हल्ला करून त्यांची क्रूर निर्दयी पने हत्या करून त्यांच्या जवळील मोबाइल, पैसे व मोटरसायकल या नराधमांनी घेऊन पसार झाले.पोलीस अधीक्षक चिन्मय जी पंडित यांनी घटनेच्या काही तासातच या तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले.
*या घटनेचा जेवढा निषेध केला जावा तितकाच कमी आहे कारण की अत्यंत गरीब कुटुंबातील तरुण हा परिसरात पशुवैद्यकीय अल्प दरात सेवा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता.परंतु महाराष्ट्रातील पोळा या सणाच्या दिवशी पशुवद्यकीय सेवा करणाऱ्या डॉक्टररचा निर्घृण हत्या करण्यात आली.ही घटना समस्त महाराष्ट्राला काळीमा फासणारी आहे. या घटनेच्या जेवढा निषेध केला जावा तितका कमी आहे.या गिरासे परिवारातील डॉ. प्रेमसिंह गिरासे हा एकमेव कर्ता कमावणारा होता. डॉ. प्रेमसिंह गिरासे यांच्या घरात पाच सदस्य आहेत ते परिपूर्ण डॉ. प्रेमसिंग गिरासे यांच्यावरती अवलंबून होते. या परिवारावर फार मोठं संकट कोसळलेले आहे. या घटनेमुळे जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील समस्त राजपूत समाज व इतर समाजातील लोकसुद्धा डॉ.प्रेम सिंग गिरासे यांच्या परिवारासोबत आहेत. यांच्या दुःखात सहभागी आहेत. म्हणून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये या घटनेचा निषेध करुन,या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी म्हणून निवेदने दिली जात आहेत.*
आज दिनांक 13/09 2021 जी रोजी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकार्यांना समस्त नंदुरबार जिल्ह्याच्या राजपूत समाजा तर्फे या घटनेच्या जाहीर निषेध करून निवेदन देण्यात आले. या निवेदनात हत्या करणाऱ्या आरोपींचा खटला फास्टट्रॅक कोर्टात दोषारोप पत्र दाखल करून एडवोकेट उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात यावी. या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी. तसेच पिडीत कुटुंबाला शासनाने आपली प्राथमिक जबाबदारी म्हणून तात्काळ आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी तसेच या कुटुंबातील एका सदस्याला सरकारी सेवेची संधी देऊन या परिवाराच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवावा. या मागण्या प्रामुख्याने करण्यात समस्त राजपूत समाजा द्वारे करण्यात आल्या.याप्रसंगी नंदुरबार जिल्ह्याचे समस्त राजपूत समाजाचे ज्येष्ठ पदाधिकारी, शिष्टमंडळ उपस्थित होते. श्री. जितेंद्रसिंह राजपूत, हितेंद्रसिंह राजपूत, योगेंद्रसिंह गिरासे, श्यामसिंह राजपूत मोहितसिंह राजपूत, रवींद्रसिंह गिरासे, रणजीतसिंह राजपूत, भीमसिंह राजपूत, प्रवीणसिंह राजपूत, चेतनसिंह राजपूत, जितेंद्र प. राजपूत,दिग्विजय गिरासे, मोहिनीराज राजपूत, डॉ. मनोज राजपूत, गिरासे, सुमानसिंह राजपूत,भूषण राजपूत, सुनील गिरासे, योगेश राजपूत, योगेश गिरासे, डॉ. मोठाभाऊ गिरासे, अंबालाल गिरासे, राजेंद्रसिंह गिरासे, चुडामन राजपूत, जितेंद्र गिरासे,कल्याणसिंह राजपूत, इत्यादी मान्यवर याठिकाणी उपस्थित होते.
Tags
news
