फार्मासिस्टाना 25 सप्टेंबर च्या अगोदर कोव्हिड योद्धा घोषित करा - डॉ पंकज चौधरी

 


शिरपूर येथे अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य फार्मासिस्ट असोशिएनच्या वतीने  महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व महाराष्ट्राचे माजी जलसंपदा वैद्यकीय शिक्षण मंत्री आ.गिरीश महाजन यांना  निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे,की फार्मासिस्टाना 25 सप्टेंबर च्याअगोदर कोव्हिड योद्धा घोषित अश्या आशयाचे निवेदन देण्यात आले त्याप्रसंगी महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉ.पंकज चौधरी,उत्तरं महाराष्ट्र सचिव प्रा. सतीश पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.देवेंद्र फडणवीस यांनी असा विश्वास दिला की या गोष्टीबद्दल पाठपुरावा केला जाईल आणि हा विषय विधानसभेत नक्कीच मांडू असे आश्वासन त्यांनी या वेळेस दिले.या प्रसंगी भाजपचे माजी तालुका अध्यक्ष राहुल रंधे प्रा.कल्पेश वाघ,सिताराम माळी,आदी उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने