श्री.रा.रा.खंडेलवाल विद्यालयातील विद्यार्थ्यांचा 25 वर्षानंतर स्नेहसंमेलन संपन्न




होळनांथे (वार्ताहर) शिरपूर तालुक्यातील होळनांथे येथील श्री.रा.रा.खंडेलवाल विद्यालयातील १९९६ च्या दहावीच्या वर्गमित्राचा  25 वर्षानंतर  *स्नेहसंमेलन*  कार्यक्रमनुकताच नागेश्वर परिसरात *29 आगस्ट2021* (रविवार) पार पडला.
याप्रसंगी जेष्ठ शिक्षक आण्णासो.पी. ओ.गुजर सर हे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाच्या सुरवातीवला सरस्वती पूजन करुन १९९६ च्या दहावीतील वर्गमित्र-मैत्रिण जे आज या जगात नाहीयेत त्यांना श्रद्धांजली अर्पण करुन कार्यक्रमाची शुरुवात करण्यात आली. कार्याक्रमाला उपस्थित सर्व जिवलग वर्गमित्र-मैत्रिणी यानी आपआपला परिचय करुन देतांना शिक्षण काय केले हल्ली काय व्यवसाय करताय हेही स्पष्ट केले,तद्नंतर आर. बी. पाटील सर,आर.सी.पाटील सर,सैंदाणे सर,मेटकर सर,पी.ए. पाटिल सर,इंदासे सर,हिरे मैडम आणि कार्यक्रमाच अधक्ष्य पी ओ गुजर सर यानी मनोगत व्यक्त करुन उपस्थित माझी विध्यार्थीना मार्गदर्शन केले यानंतर रक्षाबंधानाचा कार्यक्रम पार पडून शेवटी नागेश्वर परिसरात वृक्षारोपन करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली...कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जितेंद्र जाधव व विजय सिसोदीया यानी केले तर कार्यक्रम यशस्वीते साठी दयानंद पवार,मिथुन खिलोसिया,योगेश पवार,किशोर मराठे,किशोर चव्हाण,तनविर खाटीक, रविंद्र धनगर , कलीम शेख मुसलमान,रमेश चव्हाण, गोपाल मराठे, कैलास  भोई,सिमा धनगर ,दिपश्री पवार,योगिता राजपूत,शोभा राजपूत,वैशाली गिरासे ,अनिता राजपूत आदीनी परिश्रम घेतले.


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने