पैसे उचलण्याच्या नादात 2 लाख गमावले प्रतिनिधी दत्ता पारेकर




 प्रतिनिधी दत्ता पारेकर 

पुणे: पैशाची बॅग पळवून नेउद्देशाने चोरट्यांनी रस्त्यावर टाकलेल्या दोन-चार नोटा उचलण्यासाठी दुचाकीवरुन खाली उतरला. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी पैशांची बॅग लंपास केली. ही घटना गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास पुणे जिल्ह्यातील  इंदापूर शहरात  घडली. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून या घटनेत चोरट्यांनी 2 लाख 33 हजार रुपये चोरुन नेले.

याप्रकरणी विकास मानसिंग भोसले  (वय-42 रा. डाळज नं.1) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात  फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास भोसले हे इंदापूर शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra) शाखेतून 2 लाख 33 हजार रुपये घेऊन घरी जात होते. हिरो मोटार सायकल शोरुम जवळ रस्त्यावर अज्ञात चोरट्यांनी लबाडीच्या उद्देशाने दोन-चार नोटा टाकल्या. भोसलेंना आपल्याच पडल्या असल्याचे वाटल्याने त्यांनी दुचाकी थांबवून खाली उतरले.

भोसले नोटा उचलण्याच्या नादात असताना दबा धरुन बसलेल्या चोरट्यांनी पैशांची बॅग लंपास केली. या घटनेची नोंद इंदापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून चोरट्यांचा शोध सुरु केला आहे. पुढील तपास इंदापूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर धनवे (API ) करीत आहेत

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने